शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:46 PM

Washim News, Senior Citizen गत १० दिवसात २७ जणांना मायेचा आधार मिळाला.

वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. कोरोनाकाळात समाजातील शेवटच्या घटकातील, गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांना वैद्यकीय उपचार व भौतिक गरजा पुरविण्यासाठी निती आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय व राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्थेने दादा-दादी, नाना-नाणी अभियान हाती घेतले असून, गत १० दिवसात २७ जणांना मायेचा आधार मिळाला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. जुलै महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले असून, यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार, भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, नायब तहसिलदार कैलास देवळे, निती आयोगाच्या माधुरी नंदन यांच्या मार्गदर्शनात राजरत्न बहुद्देशीय संस्था व प्रशासनातर्फे दादा-दादी, नाना-नाणी अभियान राबविले जात आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार, कपडे व अन्य भौतिक सुविधा पुरविण्यात येतात. मोबाईलद्वारे संपर्क साधल्यास अभियानातील कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. गत १० दिवसात २७ नागरिकांपर्यत हे अभियान पोहचले असून, तोंडगाव येथील काही ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा व कपड्यांचे वाटप जिल्ह्याधिकारी कार्यालय प्रतिनिधी तलाठी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादुर, भगवान ढोले, देवा सारसकर, नंदकिशोर वनस्कर, विकास पट्टेबहादुर, अमोल कलकर विकी ढोले यांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या