‘तेलंगणा’त बंजारांवर भ्याड हल्ला; मानोऱ्यातील समाजबांधवांनी केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:33 IST2017-12-27T14:31:27+5:302017-12-27T14:33:38+5:30

मानोरा :तेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची  निर्घृुन हत्या केली. शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला.

Banjara community lodge protest of Telangana insident | ‘तेलंगणा’त बंजारांवर भ्याड हल्ला; मानोऱ्यातील समाजबांधवांनी केला निषेध

‘तेलंगणा’त बंजारांवर भ्याड हल्ला; मानोऱ्यातील समाजबांधवांनी केला निषेध

ठळक मुद्देतेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची  निर्घृुन हत्या केली. बंजारा समाज बांधवांच्यावतीने मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला. हे अत्याचार थांबवुन गोंड व कोया आदिवासी समाजाच्या दोषी विरुध्द केंद्र शासनाने तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली.

मानोरा :तेलंगना राज्यात बंजार समाजावर भ्याड हल्ला करुन चार लोकांची  निर्घृुन हत्या केली. शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मानोरा येथील तहसील कार्यालय प्रांगणात निषेध नोंदविण्यात आला. त्या आशयाचे  निवेदन बंजारा समाज बांधवांच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना पाठविण्यासाठी देण्यात आले.

तेलंगना राज्यात अनेक ठिकाणी बंजारा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मालमत्तेची जाळपोळ करण्यात आली. बंजारा समाजातील हे अत्याचार थांबवुन गोंड व कोया आदिवासी समाजाच्या दोषी विरुध्द केंद्र शासनाने तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली. निवेदनावर भाऊ नाईक, देवी सेवालाल संस्थानचे  अध्यक्ष कबीरदास महाराज, महंत  जितेंद्र महाराज, महंत सुनिल महाराज, काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राठोड, बंजारा क्रांती दलाचे कार्याध्यक्ष गजानन राठोड,  खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, महंत रायसिंग महाराज , विलास राठोड, प्रकाश राठोड, लोभी राठोड , प्रा.जगदीश राठोड, डॉ.श्याम जाधव, भावसिंग राठोड, अभय राठोड, अशोक चव्हाण, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अशोक रत्नपारखी, भारत चव्हाण, अनिल राठोड, प्रितम पवार, सरजीत  चव्हाण, शेषराव चव्हाण, दशरथ चव्हाण, किसन जाधव, भारत चव्हाण, आदिंसह तालुक्यातील शेकडो बंजारा बांधवांच्या स्वाक्षºया आहेत. तेलगना  भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शेकडो नवयुवकांनी तहसील प्रांगणात  हजेरी लावली होती.

Web Title: Banjara community lodge protest of Telangana insident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.