शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द; पुरवठा विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:34 IST

दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम शासन जमा करण्याचे तसेच संबंधित रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गावातील काही नागरिकांनी २४ मार्च २०२० रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत धान्य पुरवठ्यात गैरव्यवहार करण्यासोबतच इतरही विविध स्वरूपातील दोष सिद्ध झाल्याने केकतउमरा येथील कृषी कन्या महिला बचतगटाच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सोमवार, २५ मे रोजी दिली.केकतउमरा येथील अशोक धाडवे, अमृता पट्टेबहादूर, रवि पट्टेबहादूर, तुळसाबाई जाधव आणि ज्योती खडसे यांनी सामूहिक तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान, निरीक्षण अधिकाºयांनी ७ मे रोजी दुकानाची तपासणी करून तसा अहवाल वाशिमच्या तहसीलदारांकडे सादर केला. त्यानुसार, कृषी कन्या महिला बचतगटाच्या रास्त भाव दुकानाच्या दर्शनी भागात फलक नसल्याचे आढळून आले. याशिवाय साठा फलक, भाव फलक आढळला नाही, तक्रार पुस्तिका ठेवलेली नाही, वजन काटा प्रमाणित केल्याची पावती नाही, काही लाभार्थ्यांकडून धान्याचे अधिक पैसे घेण्यात आले, काही कार्डधारकांना देय असलेल्या धान्यापैकी कमी धान्य देत असल्याचे आढळले, कार्डधारकांना पावती दिली जात नाही, पारदर्शक बॉटलमध्ये धान्याचे नमुने ठेवले जात नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे तपासणीदरम्यान दुकानात गहू १४.४८ क्विंटल कमी आढळून आला; तर तांदूळ ६.४३ क्विंटल अधिक आढळून आला. साखरही जास्त आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी जाधव यांनी दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम शासन जमा करण्याचे तसेच संबंधित रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :washimवाशिम