महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 11:41 IST2020-08-30T11:41:16+5:302020-08-30T11:41:42+5:30

याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

Attempt to poison the woman | महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न

महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : तालुक्यातील जनुना येथील महिलेस दोन जणांनी विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न २५ आॅगस्ट रोजी केला. याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
फिर्यादी आशाबाई भगत (५५) रा. जनुना यांच्यातर्फे पोकॉ मोहन जपसरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथून मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. या जबाबानुसार, आशाबाई ही २५ आॅगस्ट एकटीच शेतात गेली होती. त्यावेळी तिथे आरोपी बाळू मनवर व प्रमोद मनवर आले आणि त्यांनी फिर्यादी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. औषधीचे काही अंश पोटात गेल्याने त्यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवी कलम ३०७, ३४, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी बाळू मनवर यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली तर दुसरा आरोपी प्रमोद मनवर फरार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी तुषार जाधव यांनी दिली. फरार आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Attempt to poison the woman