शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामासाठी मागितली भिक्षा !

By admin | Updated: April 7, 2017 22:33 IST

कारंजा लाड- जलसंधारणाची कामे करताना वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनचा खर्च करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भिक्षा मागून निधी गोळा केला.

कारंजा लाड : महाराष्ट्रात गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करताना आलेल्या अडचणींच्या वेळी आवश्यकता पडल्यास वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशिनचा खर्च करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भिक्षा मागून निधी गोळा केला. हा उपक्रम कारंजा तालुक्यातील काकडशिवणीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी राबविला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून कोरड्या दुष्काळामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. यासमस्येचा निराकरणासाठी अभिनेता अमिर खान याने राज्यशासनाला विश्वासात घेवून पाणी फाउंडेशनची निर्मिती केली. मागील वर्षी पाणी फांउडेशनच्या माध्यमातुन वॉटर कप स्पर्धा राबवून लोक सहभागातून दहा तालुक्यात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यावर्षी ही स्पर्धा राज्यातील ३० तालुक्यात घेण्यात येत आहे यामध्ये कारंजा तालुक्यातील सर्वच गावानी सहभाग घेतला आहे. पाणी समस्या ही सर्वांनाच भेडसावडणारी समस्या आहे ही समस्या मिटविण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग लाभावा या उद्देशाने कारंजा तालुक्यातील काकड शिवनी या गावात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढावा व प्रसंगी आर्थीक अडचणीने काम अडल्यास रक्कम हाती असावी म्हणून चक्क गावात भिक्षा मागीतली. यासाठी ७ एप्रिल रोजी सकाळी पाणी फउंडेशनची चमू जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत व बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून रॅली काढून घरोघरी भिक्षा मागण्यात आली. या अं तर्गत ग्रामस्थांनी ४ हजार ३९२ रुपयाचा लोक वर्गणी गोळा केली. रॅलीतील प्रकाश गवळीकर यांनी धारणकेलेली संत गाडगेबाबाची वेशभुषा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती या रॅलीत गाकवरी, विद्यार्थी, ग्राम पंचायत सरपंच, उपसपरंच, तसेच जिल्हा परिषद शाळा, तसेच बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश होता गोळा झालेल्या निधीतून जेसीबी मशीनसाठी डिझेलची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात माजी नायब तहसिलदार जाधव, पाणी फउंडेशनचे प्रशिक्षक दिलीप देवतळे, सुरज देशमुख, गोरख बढे, तालुका समन्वयक शाम सवई, प्रफुल्ल बानगावकर, आदींचाही सहभाग होता. काकडशिवणीच्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वांंकडून कौतूक करण्यात येत आहे.