शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी

By admin | Updated: January 1, 2015 01:36 IST

वाशिम जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये राबवल्या जाणार ६0१ उपाययोजना ; ९३ गावांत टँकरने पाणी.

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार जानेवारी ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामाचा या आराखड्यात समावेश असून, त्यासाठी ५४ लाख ५0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असून, त्यावर १ कोटी ४१ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ७१ गावांमध्ये ८१ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार असून, त्यासाठी ४८ लाख ६0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असून, ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार आहेत. वाशिम तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील १६, मानोरा तालुक्यातील १५ व कारंजा तालुक्यातील १७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील ३९१ गावांतील ७४१ हातपंप दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीतून ५९ लाख २८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.