शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दारू विक्री सुरूच!

By admin | Updated: April 20, 2017 02:10 IST

वाशिम : हायवेवर विकल्या जाणारी दारू शासनाच्यावतीने बंद करण्यात आल्यानंतरही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर सर्रास दारूची विक्री होत असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

वाशिम : हायवेवर विकल्या जाणारी दारू शासनाच्यावतीने बंद करण्यात आल्यानंतरही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर सर्रास दारूची विक्री होत असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शासनाच्यावतीने १ एप्रिलपासून हायवेवर असलेल्या ५०० मीटरच्या आतमधील रेस्टॉरंट, ढाबा, बीअर बार, बीअर शॉप यांना सील ठोकले आहे. वाशिम जिल्ह्यात ४२ देशी दारूच्या दुकानांना सील लावल्यानंतर केवळ १४ दारूची दुकाने शिल्लक राहिली आहेत, तर जिल्ह्यात एकही वाईन शॉप नसल्याने ठरलेल्या दरात दारू पिणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील ९४ वाईन बार बंद झाले असून, केवळ तीन बार सुरू आहेत. यामध्ये वाशिमच्या दोन बारचा समावेश व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यात एकच बार आहे. बारवर गर्दी पाहता अव्वाच्या सव्वा भावाने दारू विकल्या जात असल्याची ग्राहकांची ओरड होत असली, तरी कोणताही वाद न घालता काही जण दारू विकत घेत आहेत. एवढया गर्दीत कोण जाणार म्हणून अनेक मद्यपी हायवेवरील रेस्टॉरंट, ढाब्यांकडे धाव घेत आहेत. ग्राहक तुटू नये म्हणून अनेक व्यावसायिक मद्यपींची सोय करताना दिसून येत आहेत. काही रेस्टॉरंटवर तर चक्क खुलेआम दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. पोलीस विभागात काही रेस्टॉरंट चालकांचे नातेवाईक असल्याने त्यांना त्रास होत नसल्याचे त्यांचे प्रतिस्पर्धी व्यावसायिक बोलताना दिसून येत आहेत. याकडे कर्तव्यतत्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन त्याला आळा घालणे गरजेचे आहे. जिल्हयात १८४ ठिकाणी देशी, विदेशी दारू १ एप्रिलपूर्वी मिळत होती, ती आता केवळ २४ ठिकाणी मिळत आहे. यामुळे सकाळपासून अनेक दुकानांवर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी अनेक ढाब्यांवर, रेस्टॉरंटवर दारू खुलेआम विक्री होत असून, याकडे पोलीस विभागाने लक्ष ेदेणे गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात केवळ १० वाईन बार व बीअर शॉप१ एप्रिलपूर्वी सुरू असलेले १८४ देशी-विदेशी दारू शॉप, बीअर शॉप १ एप्रिलपासून बंद झाल्यानंतर देशी दारूची १४ दुकाने वगळता केवळ सात बीअर शॉप व तीन वाइन बार शिल्लक राहिले आहेत. दारू पिणाऱ्यांची संख्या पाहता ही दुकाने कमी पडत असल्याने सुरू असलेल्या दुकानांसह ज्या ढाब्यावर, रेस्टॉरंटवर दारू मिळत आहे तेथे मोठ्या प्रमाणात मद्यपींची गर्दी होताना दिसून येत आहे.हायवेवर असलेल्या जिल्ह्यातील १६२ दुकानांना सील करण्यात आले आहे. ज्या दुकानांना सील केले आहे, तेथे जर रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन सील करण्यात आलेल्या परमीट रुमची पाहणी वारंवार केल्या जात आहे. विभागाच्यावतीने लावण्यात आलेले सील व्यवस्थित असून, बाहेर कुठून दारु विक्री होत असावी.- एन.के. सुर्वे, प्रभारी निरीक्षक, राज्य दारू उत्पादन शुल्क विभाग, वाशिम