खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:11 IST2020-02-03T18:11:23+5:302020-02-03T18:11:32+5:30
सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लाईफ इन्शूरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एलआयसी) खासगीकरण करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेचे वाशिममध्येही पडसाद उमटले. एलआयसीच्या कर्मचाºयांनी या धोरणाविरूद्ध ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
फेडरेशन आॅफ एलआयसी क्लास-१ आॅफीसर या कर्मचाºयांच्या संघटनेने एलआयसीच्या मुंबई येथील अध्यक्षांकडे पाठविलेल्या निवेदनात ४ फेब्रूवारीला संप करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. एलआयसीचे खासगीकरण करण्याचे धोरण आखले जात असल्याने अधिकारी, कर्मचाºयांसोबतच लाखोंच्या संख्येत असलेल्या एलआयसी एजंटचे भवितव्य धोक्यात सापडणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला खासगीकरणाचा निर्णय जनमताच्या विरोधात जाऊन सरकारने घेतला, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला. यावेळी कर्मचाºयांनी कार्यालयाच्या बाहेर जमून खासगीकरण धोरणाविरूद्ध घोषणाबाजी केली.