शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

प्रशासकीय कार्यालयांनी ‘वेतनिका’ प्रणालीस गांभीर्याने घ्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:46 PM

. या प्रणालीस यापुढे गांभीर्याने घ्या, असे सक्त निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १४ मे रोजी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार वेतननिश्चिती करताना विविध स्वरूपातील अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेवून लेखा व कोषागारांच्या ‘महाकोष’ या संकेतस्थळावरील ‘वेतनिका’ प्रणालीत वेतननिश्चितीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीस यापुढे गांभीर्याने घ्या, असे सक्त निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १४ मे रोजी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.यासंदर्भातील १४ मे २०१९ च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे, की सद्य:स्थितीत प्रशासकीय कार्यालयांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती ‘वेतनिका’ प्रणालीव्यतिरिक्त अन्य मार्गाने केलेली आहे; मात्र अशा प्रकरणांची फेरनिश्चितीदेखील भविष्यात ‘वेतनिका’ प्रणालीव्दारेच करण्याची दक्षता सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांनी घ्यावी. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीची माहिती ‘वेतनिका’ प्रणालीवर उपलब्ध होऊ शकणार नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करणेदेखील अशक्य होणार आहे. त्यामुळे या प्रणालीस सर्व प्रशासकीय विभागांनी गांभीर्याने घेवून योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. ‘वेतनिका’ प्रणालीव्दारेच मिळणार वेतननिश्चिती पडताळणी प्रमाणपत्र!सातव्या वेतन आयोगानुसार केलेल्या वेतननिश्चिती पडताळणीची प्रमाणपत्रे यापुढे ‘वेतनिका’ या प्रणालीव्दारेच दिली जाणार आहेत. त्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाºयांची १ जानेवारी २०१६ ची वेतननिश्चिती ‘वेतनिका’ या संगणकीय प्रणालीमार्फत होणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार