‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:37 PM2018-09-07T13:37:11+5:302018-09-07T13:39:20+5:30

श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत असून श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यात आले आहेत.

'Abstacle' remove on the 'Shree' immersion procession route! | ‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले!

‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले!

Next
ठळक मुद्देवाशिम शहरातून श्रींची विसर्जन मिरवणूक मोठया धुमधडाक्यात काढण्यात येते. या रस्त्यावर मोठया प्रमाणात वृक्ष असल्याने ते मिरवणुकीत अडथळा आणू शकतात. मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांच्या लोंबकळलेल्या फांदया छाटण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  येत्या १३ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची स्थापना होणार आहे. श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत असून श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. रस्त्यात येणाºया झाडांच्या फांदया नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्यावतिने काढण्यात आल्यात.
श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश भक्तासह जिल्हा प्रशासनही तयारीला लागला आहे. दहा दिवस चालणाºया गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाच्यावतिनेही शहरात शांतता समितीच्या सभा घेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दहा दिवासानंतर वाशिम शहरातून श्रींची विसर्जन मिरवणूक मोठया धुमधडाक्यात काढण्यात येते. या रस्त्यावर मोठया प्रमाणात वृक्ष असल्याने ते मिरवणुकीत अडथळा आणू शकतात. याकरिता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांच्या लोंबकळलेल्या फांदया छाटण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गाची नगरपालिका प्रशासनाच्यावतिने पाहणी करुन कर्मचाºयांना काही मार्गदर्शक सूचना केल्यात.  आगामी काळात गणेशेत्सव, मोहरम उत्साहात साजर केल्या जाणार आहेत. या उत्सवादरम्यान कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्यासाठी कारणीभूत घटकांची पाहणी करुन तातडीने निवाडा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या होत्या.  त्यानुसार नगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निमशन दलाच्या चमुने झाडांच्या फांदया झाटल्यात.

मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी
श्री विसर्जन मिरवणुकीत कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये म्हणून रस्त्यात असलेल्या झाडांच्या  फांदया छाटण्याचे कार्य नगरपालिकेच्यावतिने सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबतही उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतून केली  जात आहे. दरवर्षी श्री मिरवणुकीमध्ये या खड्डयांचा गणेश मंडळांना खूप त्रास सहन करावा लागतोय. गतवर्षी श्री मिरवणूक मार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करण्यात आली होती. याहीवर्षी ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात उपाय योजना करण्यचे मत नागरिकांत व्यक्त केली जात आहे.

श्री विसर्जन मिरवणुकीसह ईतर सणानिमित्त नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये याबाबत काळजी घेतल्या जात आहे. जिल्हाधिकारी यांनी आढावा सभेत दिलेल्या सुचनांचे पालन करुन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी यात सहकार्य करावे व सर्व सण उतसाहात साजरे करावे.              
 - गणेश शेटे,
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

Web Title: 'Abstacle' remove on the 'Shree' immersion procession route!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.