शिवीगाळ, मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By सुनील काकडे | Updated: May 18, 2024 17:29 IST2024-05-18T17:29:29+5:302024-05-18T17:29:46+5:30

१७ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास नळ जोडणी व्यवस्थित आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी गेली असता चुलत सासू माधुरी अहिरकर यांनी क्षुल्लक कारणावरून अश्लिल भाषेत शिविगाळ केली.

A case has been registered against both of them in the case of abuse and assault | शिवीगाळ, मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

शिवीगाळ, मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

वाशिम : चुलत सासरा-सासूने शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी १७ मे रोजी रात्री सुनेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण राजेश अहिरकर (२८, रा. मंगरूळपीर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १७ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास नळ जोडणी व्यवस्थित आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी गेली असता चुलत सासू माधुरी अहिरकर यांनी क्षुल्लक कारणावरून अश्लिल भाषेत शिविगाळ केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलटपक्षी चुलत सासरे रामराव अहिरकर यांनी घराबाहेर येवून दोघांनीही शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच आपणास मारहाण देखील केली. अशा आशयाच्या तक्रारीवरुन नमूद  दोघांवर मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: A case has been registered against both of them in the case of abuse and assault