जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:43 IST2021-03-27T04:43:12+5:302021-03-27T04:43:12+5:30

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारक, ...

80 shops in the district closed | जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार २१ मार्चपर्यंत सर्व आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली होते. कोरोना चाचणी न केल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. आज मालेगाव शहरातील ३२, कारंजा शहरातील ९, मंगरूळपीर शहरातील ३८ व शेलूबाजार येथील १ आस्थापना बंद करण्यात आली.

मालेगाव शहरात एकूण १८७२ आस्थापना असून त्यापैकी ५१२ आस्थापनांची तपासणी आज करण्यात आली असून यापैकी ३२ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली. तसेच मंगरूळपीर शहरातील तपासणीमध्ये ३८ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्या आस्थापनासुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मुख्याधिकारी विकास खंदारे यांनी दिली.

कारंजा शहरातील आस्थापनांची तपासणी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून आजपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ९ दुकानदारांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका दुकानावर कारवाई करण्यात आल्याची माहिती कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर यांनी दिली.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली असून आजपासून आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: 80 shops in the district closed