शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वाशिम जिल्ह्यात ७.५० लाख नागरिकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:54 PM

Washim News : १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेंतर्गत १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे साथरोगही उद्भवतात. कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका हा अतिजोखीम गटातील रुग्णांना आहे. या पार्श्वभूमीवर अतिजोखीम गटातील रुग्ण शोधणे आणि त्यांच्यावर वेळीच उपचार होणेही गरजेचे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात क्षयरुग्ण व सक्रिय कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वेळीच व नियमित उपचारामुळे क्षयरोग व कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. जिल्ह्यात सध्या १०९७ क्षयरुग्ण आहेत. या रुग्णांवर नियमित उपचार केले जात आहे.सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी एक आशा स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक हे दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण व तपासणी करणार आहेत. ग्रामीण भागात दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ घरांतील सदस्यांची तपासणी होणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णाची लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. क्षयरुग्ण संशयित असणाऱ्या रुग्णाचे दोन थुुंकी नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. अहवाल निगेटिव्ह आले, तर १६ डिसेंबरनंतर एक्स-रे काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. ‘एक्स-रे’च्या माध्यमातून निदान केले जाणार असून, सर्व रुग्णांना उपचाराखाली आणण्यासाठी ही मोहीम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य