शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

६ आमदार निवडणूक रिंगणात

By admin | Updated: September 29, 2014 02:25 IST

राजकीय पक्षांच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील माजी व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी.

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिनही मतदारसंघातून १२४ इच्छूक उमेदवारांनी एकूण २0५ नामांकन दाखल केले. यामध्ये राजकीय पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये सहा आजी- माजी आमदारांचा समावेश आहे. यामध्ये दोन विद्यमान तर चार माजी आमदार आहेत.आघाडी व महायुती तुटल्याने सर्वच पक्षांनी आपआपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केल्याने अनेकांनी वेगळया पक्षातील उमेदवाराला आपल्या पक्षाची उमेदवारी दिली. काही पक्षांना तर प्रबळ उमेदवार न मिळाल्याने केवळ पक्षाचा उमेदवार रिंगणात असावा म्हणून फासरे प्राबल्य नसलेल्यांनाही उमेदवारी दिली. वाशिम जिल्हयात तीन विधानसभा मतदारसंघ असून ७ माजी व विद्यमान आमदारांनी नामांकन दा खल केले. यामध्ये ६ जणांनी राजकीय पक्षाच्यावतिने उमेदवारी दाखल केली आहे. तसेच काही माजी आमदार पुत्रांनी सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या विधानसभा निवडणुकीसाठी १२४ उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी माघार घेण्याच्या दिवसा पर्यंत बरेच अर्ज मागे घेतल्या जाणार आहेत. राजकीय पक्षांच्यावतीने उमेदवारी दिलेल्यांमध्ये प्रामु ख्याने काँग्रेसच्यावतिने वाशिम, रिसोड व कारंजा मतदारसंघात अनुक्रमे माजी आ. सुरेश इंगळे, आ. अमित झनक , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती गणेशपुरे यांचा समावेश आहे. तर भाज पाच्यावतिने आ. लखन मलीक, माजी आ. विजयराव जाधव, माजी आ. राजेद्र पाटणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने डॉ. दिपक ढोके, बाबाराव खडसे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, शिवसेनेच्यावतिने निलेश पेंढारकर, विश्‍वनाथ सानप, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधिर क व्हर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याव ि तने ज्ञानेश्‍वर जाधव, जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, रणजीत जाधव, बसपा व भारिपच्यावतीनेही उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक, वाशिम विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलीक हे दोन विद्यमान तर माजी आ. सुरेश इंगळे, माजी आ. सुभाषराव ठाकरे, माजी आ. विजय जाधव, माजी आ. राजेंद्र पाटणी या सहा जणांना राजकीय पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. कारंजाचे विद्यमान आमदार प्रकाश डहाके ऐवजी यावेळी सुभाष ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने येथे समिकरणात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. यासह माजी आ. बाबासाहेब धाबेकर, गजाधर राठोड यांच्या पुत्रांनीही उमेदवारी दाखल केली आहे.