शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

५१ गावांत पोलिस सुरक्षा मोहीम

By admin | Updated: July 25, 2014 00:10 IST

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्यावतीने ५१ गावात पोलिस सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे.

सिंदखेडराजा : जनसामान्य लोकात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्यावतीने ५१ गावात पोलिस सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे कायदा व सुरक्षा धोक्यात आणणार्‍या अनेक गोष्टींना चाप बसणार आहे. साखरखेर्डा येथे महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्र, बसस्थानक, गुजरी चौक, आठवडी बाजार या वर्दळीच्या ठिकाणी नेहमीच चुटफुट घटना घडतात. फेसबुकवर अश्लील फोटो टाकणे, टिका टिपण्णी करणे, नको तो संदेश लोड करुन धार्मिक भावना भडकावणे, इंटरनेटचा गैरवापर करणे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सिमकार्ड विक्रेत्यांनी खरेदीदार ग्राहकांचे रजिस्टर मेंटन करणे, कित्येक वेळा युवक सिमकार्डचा गैरवापर करुन ते सिमकार्ड वापरानंतर फेकून देतात. त्यामुळे आरोपींना पकडण्यात वेळ लागतो. यासाठी रजिस्टर मेन्टन्स करणे महत्वाचे आहे. एका व्यक्तीला एकच सिमकार्ड बंधनकारक असावे, असाही सूर बैठकीतून निघाला. सण, उत्सव, जयंती या दरम्यान समाज विघातक लोक अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोन्ही समाजात भावनिक वातावरण लोप पावते. यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक व्यक्तींनी अशा समाजविघातक व्यक्तींपासून सावध राहून पोलीसांना सुचना द्याव्यात. नेहमीच पुतळा विटंबनाचे प्रकार घडतात. त्यासाठी पुतळा समिती स्थापन करुन प्रत्येकठिकाणी संरक्षण कठडे उभारावे. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घ्यावा, असाही प्रस्ताव मांडण्यात आला. आठवडी बाजार, गुजरी चौक, बसस्थानक याठिकाणी चिडीमारीचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांपासून सावधानता बाळगावी यासाठी ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अपेक्षीत आहे. शिक्षक कॉलनी मेनरोडवर राहणारे नागरिक यांनी आपल्या घरासमोर रात्रीच्यावेळी लाईट लावणे महत्वाचे आहे. या बाबींवर शांतता कमिटी मिटींगमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर भाडेकरुंना घर भाड्याने देतांना त्याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. पोलीस सुरक्षितता मोहिमेसाठी जनतेने सहकार्य करावे. जेणेकरुन कोणत्याही घटनेचा उलगडा त्वरीत होईल, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)