शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीअभावी ५ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:29 IST

Washim Agriculture News ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी ७२ तासां  कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक असताना जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांना यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. त्यात काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान खूप झाले. या पिकासाठी जिल्ह्यातील १४६६३९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.  परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पीकविम्यातून भरपाई करण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांत ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑफलाईन पद्धतीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५९४ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. 

नुकसानाचे ९३ टक्के पंचनामे  जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी पीकविमा मिळण्यासाठी ११५०४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर पीकविमा कंपनीकडून नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाभरात १०३ प्रतिनिधींची नियुक्ती केली. या प्रतिनिधींनी गावागावात पोहोचत पंचनाम्यांना वेग दिला. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे आजवर ९३ टक्केच पंचनामे होऊ शकले. 

पीकविमा भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भात १४६५३९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. निकषानुसार त्यांनाच पीकविम्याचा लाभ मिळेल.  -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती