१३ जागेसाठी ४२७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:34 AM2021-01-15T04:34:07+5:302021-01-15T04:34:07+5:30

मंगरूळपीर तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शेलुबाजार येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत असून १३ जागेसाठी एकूण ४० उमेदवार ...

4277 voters will exercise their right to vote for 13 seats | १३ जागेसाठी ४२७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

१३ जागेसाठी ४२७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next

मंगरूळपीर तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शेलुबाजार येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत असून १३ जागेसाठी एकूण ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे .यामध्ये १९ महिला व २१ पुरुष उमेव्दारांचा समावेश आहे. एकूण ५ प्रभागामधून १३ उमेदवार निवडून येणार आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून ५९६ महिला व ५८९ पुरुष असे एकूण ११८५ मतदार आहेत . प्रभाग क्रमांक २ मध्ये ३२९ महिला व ३१६ पुरुष असे एकूण ६४५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत .प्रभाग क्रमांक ३ मध्ये ३२८ महिला व ३४५ पुरुष असे एकूण ६७३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४१६ महिला व ४४७ पुरुष असे एकूण ८६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ४४२ महिला व ४६९ पुरुष असे एकूण ९११ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत कोणता गट सत्ता खेचून आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 4277 voters will exercise their right to vote for 13 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.