वाशिम जिल्ह्यातील ४ गुन्हेगारांना कोरोनामुळे साेडले पॅराेलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:52 IST2020-10-30T12:51:49+5:302020-10-30T12:52:03+5:30

Washim News जिल्हा कारागृहातील ४ गुन्हेगारांना पॅराेलवर साेडण्यात आले आहे.

4 criminals from the district on parole due to corona | वाशिम जिल्ह्यातील ४ गुन्हेगारांना कोरोनामुळे साेडले पॅराेलवर

वाशिम जिल्ह्यातील ४ गुन्हेगारांना कोरोनामुळे साेडले पॅराेलवर

वाशिम : काेराेनाचा संसर्ग वाढू नये याकरिता काही अटींवर जिल्हा कारागृहातील ४ गुन्हेगारांना पॅराेलवर साेडण्यात आले आहे. यांना पॅराेलवर साेडल्यानंतर काेणतीही गुन्हे वाढलेले नाहीत. 
जिल्हा कारागृहातून ज्या गुन्हेगारांना साेडण्यात आले ते किरकाेळ घटनेतील गुन्हेगार असून चारही गुन्हेगार हे ग्रामीण भागातील आहेत. या गुन्हेगारांना पॅराेलवर साेडून दिल्यानंतरही त्यांच्या पाेलिसांचा वाॅच असून त्यांना साेडल्यानंतर काेणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ झाली नसल्याची माहीती जिल्हा कारागृहाचे अधिक्षक साेमनाथ पाडुळे यांनी  दिली. तसेच दरमहा त्यांना संबधित पाेलीस स्टेशनला हजरेी लावावी लागत आहे.


गुन्हेगारांना पॅराेलवर साेडल्यानंतर दरमहा त्या राहत असलेल्या नजिकच्या पाेलीस स्टेशनला हजेरी लावतात. याची चाैकशी कारागृहातून केल्या जातेय. त्यांना साेडल्यानंतर गुन्हेगारीत वाढ झालेली नाही.
- साेमनाथ पाडुळे, जिल्हा कारागृह अधिक्षक

Web Title: 4 criminals from the district on parole due to corona