१४१४ विशेष कार्यकारी अधिकारी बरखास्त!

By Admin | Updated: February 12, 2016 01:53 IST2016-02-12T01:53:58+5:302016-02-12T01:53:58+5:30

शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे सुधारित निकष तयार केले.

1414 Special Executive Officer Sacked! | १४१४ विशेष कार्यकारी अधिकारी बरखास्त!

१४१४ विशेष कार्यकारी अधिकारी बरखास्त!

वाशिम: शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे सुधारित निकष तयार केल्याने यापूर्वी नियुक्त केलेले विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात १ हजार ४१४ विशेष कार्यकारी अधिकारी होते. शासनाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाते. कागदपत्रे छायांकित करणे यासह अन्य काही अधिकार या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना दिले जातात. या निवड प्रक्रियेत बदल झाल्याने जिल्ह्यात ११ नोव्हेंबर २0१0 पासून नियुक्त करण्यात आलेले विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सर्व नियुक्त्या (पदसिद्ध नियुक्त्या वगळता) रद्द केल्या आहेत. या सर्व विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना पुरविण्यात आलेले रबरी शिक्के संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्वांना देण्यात आल्या.

Web Title: 1414 Special Executive Officer Sacked!