शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांंत लागली १.३९ लाख झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:15 IST

सामाजिक वनीकरणाचे यश; उन्हाळ्यात झाडांच्या संगोपनासाठी टँकरने पाणी.

सुनील काकडे / वाशिम : निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल कायम राखण्याकरिता केवळ वृक्षलागवड करुन चालणार नाही; तर वृक्षांच्या संगोपनावरही अधिक भर द्यावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेवून सामाजिक वनीकरण विभागाने जिल्ह्यातील रस्त्यांवर गत ३ वर्षांंत प्रत्यक्ष लागवड केलेल्या १,४३,0४७ झाडांपैकी १,३९,१२५ झाडांचे नीट संगोपन करुन ती वाढविली आहेत. पर्यायी वनक्षेत्र निर्मितीच्या संकल्पनेतून सन १९८२ मध्ये सामाजिक वनिकरण विभागाची निर्मिती झाली. लोकांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण करण्यासाठी सामाजिक वनिकरण विभागातर्फे गट लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, मध्यवर्ती रोपवाटिका, वनमहोत्सव रोपवाटिका, किसान रोपवाटिका, राष्ट्रीय बांबू विकास अभियान, राष्ट्रीय हरितसेना आदी योजना राबविल्या जात आहेत.  जिल्ह्यात सामाजिक वनिकरणकडून रस्त्याच्या दुतर्फा लागवड करून संवर्धन करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये गुलमोहर, सिसू, सिरस, कडूनिंब, सिताफळ, करंज, पापडा, कपोक, बिहाडा, चिंच आदींचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील वाशिम-अनसिंग, वाशिम- शेलुबाजार, कृष्णा-उकळी, अनसिंग-वाई वारला, वाशिम-तोरनाळा या मार्गांंवर सामाजिक वनिकरण विभागाने वृक्षलागवड करून त्याच्या संवर्धनावर विशेष भर दिला आहे. २00 झाडांमागे १ मजूर याप्रमाणे झाडांची निगा राखणे, काटेरी कुंपन तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे, आदी कामे केली जातात. यामुळेच अधिकाधिक वृक्ष जगविणे सामाजिक वनिकरणला शक्य झाले आहे.वाशिम तालुक्यात तांदळी शेवई येथे असलेल्या रोपवाटिकेत विविध झाडांची रोपे तयार केली जातात. रोपांची ४ ते ५ फुट वाढ झाल्यानंतर मागणीनुसार सामाजिक वनिकरणसह इतरही विभागांना त्याचा पुरवठा केला जातो. यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये वृक्षलागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.