जिल्हा परिषद गटाचे १२२ तर पंचायत समिती गणाचे १९४ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 12:08 PM2021-07-07T12:08:08+5:302021-07-07T12:08:37+5:30

Washim ZP By-elections : जिल्हा परिषद गटाचा एक तर पंचायत समिती गणाचे तीन अर्ज अवैध ठरले तर उर्वरीत सर्व अर्ज वैध ठरले.

122 applications of Zilla Parishad group and 194 applications of Panchayat Samiti group are valid | जिल्हा परिषद गटाचे १२२ तर पंचायत समिती गणाचे १९४ अर्ज वैध

जिल्हा परिषद गटाचे १२२ तर पंचायत समिती गणाचे १९४ अर्ज वैध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होऊ घातली असून अंतिम मुदतीपर्यंत १४ गटांसाठी १२३ तर २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवार, ६ जुलै रोजी छानणी केली असता जिल्हा परिषद गटाचा एक तर पंचायत समिती गणाचे तीन अर्ज अवैध ठरले तर उर्वरीत सर्व अर्ज वैध ठरले.
जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. 
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. 
२९ जून ते ५ जुलै या दरम्यान जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी १२३ तर पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी अर्जाची छानणी केली असता वाशिम, रिसोड व कारंजा तालुक्यातील पंचायत समिती गणाचा प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला. मानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचा एक उमेदवारी अर्ज अवैध ठरला.

Web Title: 122 applications of Zilla Parishad group and 194 applications of Panchayat Samiti group are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.