भाजपचा युवा नेता थोडक्याच बचावला; कार दरीत कोसळल्याने झाला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 17:35 IST2021-01-26T17:32:58+5:302021-01-26T17:35:03+5:30
Accident : मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत.

भाजपचा युवा नेता थोडक्याच बचावला; कार दरीत कोसळल्याने झाला गंभीर जखमी
मनोर : पालघरमधील मनोर मस्तान नाका मार्गावर हात नदीजवळ असलेल्या धोकादायक वळणावर चारचाकी मोटर वाहन दरीत कोसळल्याने भाजपचा युवा नेता रोहन चौधरी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.
मनोर वेलगाव रोड येथे राहणारा रोहन चौधरी हा आपल्या चारचाकी डस्टर कारने घरी येत असताना हात नदी जवळील मार्गावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात रोहनची चारचाकी मोटर वाहनावरून ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळून अपघात झाला. त्यामध्ये त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत.