शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण शेट्टी होणार वसई-विरारचे नवे महापौर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:01 IST

संभाव्य महापौर म्हणून माजी उपमहापौर असलेले नालासोपाराचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते.

- आशिष राणेवसई : वसई-विरार महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी दुपारी महापौर पदासाठी वसई ‘ई’ प्रभाग समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज पालिका नगरसचिवाकडे दाखल करण्यात आल्याची माहिती नगरसचिव संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. शुक्रवार, २३ आॅगस्ट रोजी महापौरपदाची ही निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे सोमवारी या पदासाठी पालिकेतील सत्ताधारी बविआ आणि नाममात्र अशा शिवसेना-भाजप युतीकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्वांमध्ये आश्चर्य आहे. एकूणच बविआतून महापौर पदासाठी एकमेव प्रवीण शेट्टी यांचाच अर्ज दाखल झाल्याने आता शुक्र वारी संपन्न होणाऱ्या निवडणुकीत केवळ त्यांच्या घोषणेची औपचारिता बाकी आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे हे काम पाहतील. दरम्यान, वसई - विरारचे मावळते महापौर रुपेश जाधव यांनी गेल्या महिन्यात महापौर पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी आणि पालिका आयुक्तांकडे दिला होता.उमेश नाईक नाउमेद?संभाव्य महापौर म्हणून माजी उपमहापौर असलेले नालासोपाराचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी धक्कातंत्र देत पुन्हा एकदा आ. हितेंद्र ठाकूर यांनी वेगळेच नाव समोर आणून या पदासाठीच्या शर्यतीत शक्तीप्रदर्शन करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार