शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

बविआच्या गोटात सन्नाटा ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:18 IST

वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले.

वसई : पालघर लोकसभेची महत्वाची जागा गमावल्याचे समजल्यानंतर पालघर सहित वसई- विरार तालुक्यातील आ. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडी व त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी सन्नाटा पसरला.

वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले. गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाठिकाणी निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच बविआचे बळीराम जाधव व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यातील चुरशीच्या लढतींविषयी केवळ पालघर जिल्ह्यालाच नाही तर या लढतींकडे उभ्या देश व राज्याचे लक्ष होतेच मात्र तशी एक मोठी उत्सुकता हि दोन्ही युती व आघाडी च्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र सकाळी १० नंतर गावित यांच्या बाजूने विजयाच्या आघाडीचा कल दिसू लागताच बविआ सहित मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांची धाकधुक बºयापैकी वाढली. नंतर पुढे निकाल स्पष्ट दिसू लागताच बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी व काँग्रेस समर्थकांचे चेहरे मात्र उतरले. एकूणच त्यावेळी देशभरात मोठं मोठ्या दिग्गजांच्या पराभवानंतर देशात व राज्यात सर्वत्र मोदी व सेनेची लाटच दिसत होती आणि आता केंद्रात सरकार येत असल्याच्या खुशीत महायुतीचे कार्यकर्ते चौकाचौकात गर्दी करू लागले.

यामध्ये मात्र बोईसर सहित वसई-विरार, नालासोपारा वसई गाव ,नवघर माणिकपूर शहर, वसई पूर्व पश्चिम आदी ठिकाणची बविआ कार्यालयात बºयापैकी कार्यकर्ते व नेते मंडळी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, महायुतीने वाटले लाडू पेढेएकीकडं बविआ च्या मुख्यालयापासून ते वसई विरार आणि नालासोपारा येथील विविध पक्ष कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला तर दुसरीकडे देशात व राज्यात फक्त आणि केवळ मोदी लाट आल्याची आकडेवारी पाहिल्यावर याच पराभूत झालेल्या बविआच्या विविध कार्यालयाबाहेर वसई विरार नालासोपाराच्या चौका चौकात ‘नमो चहा’ असो किंवा पेढे व लाडू यांचे वाटप केले. अगदी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश करीत भाजप व सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरील नागरिकांचे तोंड गोड करण्यात मश्गुल झाले होते. यावेळी पोलिसांनी विजय मिरवणूकांना जरी बंदी घातली असली तरी महायुतीच्या हौशी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी बविआ, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या व त्यांच्या पदाधिकारी व नेत्यांची कार्यालये व यांच्या निवासस्थानी शुकशुकाट दिसला तर संध्याकाळी सुद्धा या पक्ष कार्यालयाकडे कुणी फिरकले नाही.महायुतीचे आता पुढचे लक्ष्य विधानसभालोकसभेची निवडणूक जिंकून आता भाजप-शिवसेना महायुतीने पालघरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र आता खरी लढत विधानसभेत पहायला मिळेल. सध्या बविआची वसई, बोईसर व नालासोपारा असे तीन आमदार आहेत. त्यामुळे आता आमचे मुख्य उद्दिष्ट विधानसभा असून या तिन्ही मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते सक्रि य होत आहेत, अशा ही प्रतिक्रि या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून येत होत्या.

टॅग्स :palghar-pcपालघर