शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आकेगव्हानच्या महालक्ष्मीची यात्रा

By admin | Updated: April 1, 2016 03:13 IST

कासा परिसरातील आकेगव्हान येथील यात्रेला सुरूवात झाली आहे. २८ मार्च पासून सदर यात्रा सुरू झाली असून सतत दहा दिवस चालणाऱ्या यात्रेता भाविकांची गर्दी वाढणार

- शशिकांत ठाकूर,  कासाकासा परिसरातील आकेगव्हान येथील यात्रेला सुरूवात झाली आहे. २८ मार्च पासून सदर यात्रा सुरू झाली असून सतत दहा दिवस चालणाऱ्या यात्रेता भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.पालघर तालुक्यातील नानीवली जवळ आकेगव्हान येथे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. गेल्या चार वर्षापासून येथे दहा दिवसाची यात्रा भरते. दरवर्षी रंगपंचमी पासून होम हवन पुजा करून यात्रेला सुरूवात होते. सदर मंदिरात महालक्ष्मी, कालिका, सरस्वती व रेणुका मातेच्या पांडवकालीन मुर्त्या आहेत. सदर ठिकाणी पुर्वी लाकडी व कौलारू मंदिर होते. परंतु खूप वर्षाचा कालावधी व वेळोवेळी दुरूस्ती अभावी मंदिर कोलमडून गेले होते. या ठिकाणी पूर्वी यात्रा व विविध देवीचे उत्सव स्थानिक पातळीवर साजरे केले जात होते परंतु मंदिराच्या दुरावस्थेमुळे सदर उत्सव बंद पडले होते. ही देवी जागृत असल्याचे मानले जाते. दरम्यान, गेल्या चार वर्षापुर्वी परिसरातील दानशुर व्यक्ती व भक्तांनी एकत्र येवून मंदिराचा जिर्णोद्धार व मंदिर उभारणीसाठी मंडळ स्थापन करून मंदिर उभारणीसाठी दानशुर व्यक्तीच्या मदतीने निधी गोळा केला व सदर ठिकाणी नव्याने मंदिराच्या कामास सुरूवात केली व मागील वर्षी मंदिर बांधून पूर्ण करण्यात आले व इतर कामे सुरू आहेत. आणि चार वर्षापासून यात्रा उत्सवही सुरू करण्यात आला आहे. सदर मंदिर सुर्यानदीच्या जवळ असल्याने भाविकांच्या सोईसुविधासाठी मुबलक पाणी आहे. गेल्या दोन दिवसापासून परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असून विविध करमणूक वस्तु, खेळ व प्रदर्शने यात्रेत मांडली आहेत.