शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच....! नगराध्यक्षांसहीत 9 जागांवर विजय, जव्हार प्रतिष्ठानला 1 जागेवर समाधान, NCPनं राखल्या 6 जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 4:31 PM

जव्हारकरांनी शेवटी अपक्षांना धूळ चारत शिवसेनेला कौल दिला असून शिवसेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकत जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच हे सिद्ध केले आहे.

जव्हार - जव्हारकरांनी शेवटी अपक्षांना धूळ चारत शिवसेनेला कौल दिला असून शिवसेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकत जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच हे सिद्ध केले आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पटेल हे १९२ मतांनी विजय झाले तर सेनेने ९ नगरसेवक आणत आपले वर्चस्व प्रस्थापित केले यावेळी गत निवडणुकीत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला ६ जागांवर समाधानी राहावे लागले तर जव्हार प्रतिष्ठान आणि भाजपा युतीला मतदारांनी नाकारले असून त्यांच्या पदारात २ जागा टाकल्या. 

अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या जव्हार नगरपरिषद निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला असून सेनेने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. तर राष्ट्रवादीने ६ जागा जिंकल्या मात्र सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा असलेल्या जव्हार प्रतिष्ठानचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत पाटील यांनी फक्त नगराध्यक्षपदासाठीच नंबर दोनची मते मिळवली मात्र प्रभाग निहाय नगरसेवक पदांचे उमेदवार पुरते ठेपाळले दिसले तर ५ जागा लढविणाऱ्या भाजपाला एका जागेवर यश मिळाले तर स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसचा मात्र सुफडा साफ झाल्याचे चित्र होते. जव्हारच्या निवडणुकीत शेवटी शेवटी वैयक्तीक पातळीवरही प्रचार झाला मात्र त्याला जव्हार करानी भीक न घालता सेनेला पसंती दिल्याचे दिसले या निवडणुकीत राष्ट्रवादीचे  माजी नगराध्यक्ष रीयाज मनियार शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गणेश राजपूत माजी नगरसेविका मनिषा वाणी आशा बल्लाळ यांना पराभवाची धूळ चाखावी लागली तर दुसरीकडे रजपुत आणि मनियार या दोघांच्या पत्नी मात्र निवडून आल्या. एकूणच दिग्गजांच्या प्रचार सभा, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक रसद कार्यकर्त्यांची फौज आणि शेवटच्या क्षणापर्यंत गाफिल न झालेले शिवसैनिक यांच्या बळावर ही निवडणूक सेनेला जिंकता आली. 

या लढती राहिल्या लक्षात  यामध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचे रहीम लुलानिया आणि सेनेच्या गणेश रजपूत यांच्यात चुरशीची लढाई झाली यामध्ये लुलानिया यांनी मात दीली तर आधीपासूनच लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग ५ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक कांगणे यांनी एकाहाती ही निवडणूक जिंकत सर्वाधिक ३९७ मताधिक्याने जिंकणारे एकमेव नगरसेवक ठरले तर प्रभाग ७ मधील वैभव अभ्यंकर आणि सेनेचे चित्रांगण घोलप यांच्या अटीतटीची लढाई झाली यात अभ्यंकर यांचा अवघ्या २२ मतांनी विजय झाला.तर १०० वर्षांच्या इतिहासात मुस्लिम महिला नगरसेविका म्हणून रश्मी रीयाज मणियार या निवडून आल्या. ...असेही घडलेजव्हार नगरपरिषद निवडणूकीत सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीच बंडखोरी झाली यावेळी जव्हारमधील दिग्गज नेते दिलीप तेंडुलकर यांनी बंड करीत कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवली यामुळे सुरुवातीला जव्हार प्रतिष्ठानचे भरत पाटील राष्ट्रवादीचे संदीप वैद्य सेनेचे चंद्रकांत पटेल आणि कॉंग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर अशी लढत होती मात्र यानंतर अचानकपणे सेना आणि राष्ट्रवादीमध्येच लढत दिसून आली मात्र निकालानंतर अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली तर प्रतिष्ठान आणि काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना स्वतःपुरतीच मते मिळाल्याचे दिसले यामुळे राष्ट्रवादीचे ६ नगरसेवक येऊनही नगराध्यक्षपदाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिले तर नगरसेवकांची संख्या शुन्य असूनही प्रतिष्ठान आणि कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार मात्र नंबर दोन आणि तिन वर राहीले.

प्रभाग निहाय विजयी उमेदवार त्यांना पडलेली मते आणि पक्षजव्हार नगर परिषद विजयी उमेदवार 1. राजपूत पद्मा गणेश - शिवसेना मिळालेली मते-3012. माळगावी संकेत अशोक - शिवसेना - 2853. सोनावणे स्वाती अजय -शिवसेना - 2624. वाघमारे यतीन काशीनाथ -अपक्ष - 2595. लुलनिया रहीम करीम- राष्ट्रवादी - 2596. अहिरे विशाखा भीमराव-राष्ट्रवादी - 2327. उदावंत कुणाल प्रदीप-भाजप - 2548. अहिरे संगीता नंदकिशोर-शिवसेना - 2439.कांगणे दीपक मारुती- राष्ट्रवादी - 52410. कुवरा कमल कामळकर- राष्ट्रवादी - 42211. चव्हाण सुनीता परशुराम - शिवसेना - 28412. औसरकर अमोल मधुकर- शिवसेना -42513. अभ्यंकर वैभव श्रीकांत- राष्ट्रवादी - 25414. चव्हाण जयश्री रवी - शिवसेना - 30615. भोये विनोद बालु- शिवसेना 50616. तामोरे हर्षदा कपील- शिवसेना - 52817. मनियार रश्मीन रियाज - राष्ट्रवादी 492तर नगरध्यक्ष चंद्रकांत (भिकू)पटेल 1768

दीपक कांगणे

टॅग्स :Shiv Senaशिवसेना