शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वसईत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

By admin | Updated: April 16, 2017 04:23 IST

वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने

वसई : वसई पंचायत समितीसमोरील अनधिकृत टपऱ्या ताबडतोब दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा देऊनही तहसिलदारांनी कारवाई न केल्याने या टपऱ्यांना अभय मिळाले आहे.वसई पंचायत समितीसमोरील सरकारी मालकीच्या मोकळ््या जागेत पूर्वी वर्तमानपत्र विक्रीचा एकच स्टॉल आणि सरबताची एक गाडी होती. मात्र, गेल्या दहा वर्षात या भागातील चित्र पार बदलून गेले आहे. सरकारी जागेत अनेक टपऱ्या बांधण्यात आल्या असून त्यातील काही तर पक्क्या स्वरुपाच्या बनवण्यात आल्या आहेत. झेरॉक्सच्या दुकानापासून वडापाव, भजीपाव, वेज-नॉन व्हेज खानावळ, कोल्ड्रींक्सच्या टपऱ्या तयार झाल्या आहेत. या टपऱ्यांनी हळूहळू सरकारची संपूर्ण जागाच गिळून टाकली आहे. या परिसरात कोर्ट, पंचायत समिती, तहसीलदार कचेरी, भूमी अभिलेख कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय, रेस्ट हाऊस, आरटीओ कॅम्प अशी तालुक्यातील महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो लोकांची ये-जा असते.या टपऱ्यांमुळे आता वाहतूकीला अडथळे येऊ लागले आहेत. पंचायत समितीकडे जाणारा रस्ता आता नावापुरताच उरला आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये दररोज हजारो लोक येत असतात. पण, त्यांच्यासाठी निवाऱ्याची कोणतीही सोय नाही. टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर रिक्शा स्टँड आहे. कैद्यांना घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या दररोज दोन-तीन व्हॅन उभ्या असतात. महापालिकेचा बस थांबा पण इथेच आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणे दूर करण्यात यावीत अशी मागणी दिलीप पाटील आणि अनिल वर्तक यांनी सातत्याने लावून धरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना १८ नोव्हेंबर २०१६ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा १५ फेब्रुवारी २०१७ रोजी टपऱ्या पाडण्याचे आदेश तहसिलदारांना दिले होते. मात्र, दोन्ही आदेश तहसिलदारांना धुडकावून लावत टपऱ्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट टपऱ्यांना अभय दिले. त्यामुळे दिलीप पाटील यांनी विभागीय कोकण आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी दखल घेतल्यानंतर उपायुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी ३१ मार्च २०१७ रोजी टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तीन आदेश आणि आता थेट कोकण आयुक्त कार्यालयातून टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आले असतानाही तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. उलट ही जागा नेमकी कुणाच्या मालकीची आहे हे आधी तपासावे लागेल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगत तहसिलदार पाटोळे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.