शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar: नायगावमध्ये नागरिकांमध्ये खड्डयांमूळे संताप, रास्ता रोको करत पाच तास केली वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:01 IST

Vasai Virar News: वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

- मंगेश कराळे नालासोपारा - वसई विरारमध्ये रस्त्यांवरील जीवघेणा खड्डयांमूळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. खड्डयांसाठी राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही प्रशासन खड्डे बुजवत नाही. नायगावच्या जूचंद्र नाका येथे खड्डयांसाठी मंगळवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास सहा तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोक कामासाठी आठ-आठ किलोमीटर चालत कामावर गेले. मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

नायगावचे रस्ते दरवर्षी पावसात पूर्णपणे तुटतात. कारण प्रत्येक वेळी कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात. पहिल्याच पावसात रस्ते खचून खराब होतात.  नायगावच्या रस्त्यांवर अगणित खड्डे पडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्डयांमूळे दररोज अपघात होत आहेत. नायगाव स्टेशन ते मुंबई अहमदाबाद महामार्ग पर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डयात गेला आहे. खड्यांमूळे रिक्षा चालवणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन खड्डे बुजवत नाही. खड्डयांयांमुळे दररोज रिक्षा खराब होत आहेत.  जितके पैसे कमावले तेवढे रिक्षाचा मेंटेनन्सला खर्च होतो, सीएनजीसाठी काशीमिऱ्याला जावे लागते, खड्डयांमूळे दिवस त्यातच जात असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. 

रिक्षा चालकांच्या विविध समस्यांबाबत नायगावच्या जूचंद्र नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सहाशेहून अधिक रिक्षाचालकांचा सहभाग असलेल्या रिक्षामालक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.  यावेळी सहायक आयुक्त मनाली शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय यादव, पोलीस अधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे मनाली शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार