शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षापूर्वी घरातून अचानक बेपत्ता झालेला वसईचा 'संतोष' अखेर मिरजेतील रुग्णालयात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 08:44 IST

१३ जानेवारी रोजी मिरजेत कृष्णाघाटमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते.

सांगली -  वसईच्या गावराईपाड्यात पानटपरी चालविणारे संतोष दामोदर पाटील २००९ मध्ये अचानक बेपत्ता झाले. तब्बल १७ वर्षे कुटुंबीयांनी त्यांचा दाहीदिशा त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. ते मरण पावले असावेत, अशी शंकाही व्यक्त होत राहिली; पण काळाची चक्रे फिरली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयाने त्यांची नातेवाइकांशी गाठभेट घालून दिली.

१३ जानेवारी रोजी मिरजेत कृष्णाघाटमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते. प्रशासन व समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी त्यांची जबाबदारी घेतली. पण तो असंबद्ध बडबडत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याने आपले नाव संतोष पाटील असून, वसईचा राहणारा असल्याची त्रोटक माहिती दिली. राऊत यांनी ही माहिती वसईमध्ये मित्रांना पाठविली. ती माहिती नगरसेवक गणेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. योगायोगाने संतोष हे गणेश यांचे चुलतभाऊ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलद्वारे भावाशी बोलणे केले. शनिवारी संतोष यांची पत्नी मंदा, मुलगा हर्षदसह मिरजेत दाखल झाले. संतोष यांना वसईत आणले. तसेच संतोष यांच्यावर योग्य उपचाराबद्दल रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद दिले.

परतण्याची आशा नव्हती

२००७ मध्ये संतोष यांच्या मोठ्या भावाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मानसिकदृष्ट्या बेचैन अवस्थेत त्यांनी घर सोडले. कुटुंबीयांनी त्यांच्या शोधासाठी अर्धा महाराष्ट्र पालथा घातला. हळूहळू त्यांचा विसरही पडत गेला. पत्नी मंदा मात्र पतीच्या परतण्यावर विश्वास ठेवून होत्या. मुलगा हर्षद हा वडील बेपत्ता झाले तेव्हा सात-आठ वर्षांचा होता. त्याने कळत्या वयात काल प्रथमच वडिलांना पाहिले. दरम्यान, संतोष कोठे गेले, कोठे फिरले याची माहिती ते सांगू शकत नाहीत.

मी नुकतीच पालिका निवडणूक जिंकलो आहे. त्यामुळे खंडोबा मंदिरात जागर व गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमावेळीच संतोषविषयी माहिती मिळाली. तो पुन्हा घरी परतल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे वसई-विरार पालिकेचे नगरसेवक गणेश पाटील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai man missing for 17 years found in Miraj hospital.

Web Summary : After 17 years, Santosh Patil, missing from Vasai, was found in a Miraj hospital. Injured in an accident, he gave his name, leading to a reunion with his family, who had almost given up hope after his disappearance following a family tragedy in 2007.