शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

यूपीएससीत मुस्लिम तरु णांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:58 IST

भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशभरातील ५२ मुस्लिम तरु णांनी विविध क्रमांकांनी उत्तीर्ण होऊन बाजी मारली.

कुमार बडदेमुंब्रा : भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशभरातील ५२ मुस्लिम तरु णांनी विविध क्रमांकांनी उत्तीर्ण होऊन बाजी मारली.यूपीएससी या अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परीक्षेत मुस्लिम तरुणांनी प्राप्त केलेले यश हे देशाच्या प्रशासन व्यवस्थेला वेगळी दिशा देणारे ठरणार आहे.मागील २०१७ मध्ये जाहीर झालेल्या निकालाच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुस्लिमांची संख्या फक्त एकने जास्त असली तरी उपलब्ध आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत या परीक्षेत बाजी मारलेल्यांची संख्या २२ ने वाढली आहे. २०१३ मध्ये ३० तर २०१४ मध्ये ३४ मुस्लिम तरु ण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.२०१५ मध्ये ३८ तर २०१६ मध्ये ३६ आणि २०१७ मध्ये ५१ मुस्लिम तरु ण यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले होते. कालपरवा जाहीर झालेल्या निकालामध्ये मुस्लिम तरु णतरु णींनी बाजी मारली. ज्या मुस्लिम तरुणांनी यश संपादन केले, त्यामध्ये सादमिया खान, फैजुल हसिब, जमिल झेबा, हसिना रिजवी, अजहर झिया, सय्यद अली अब्बास, मोतीउर रेहमान, असिफ खान, सय्यद इमरान मसुद, इलमा अफरोज, इजाज अहमद, मोहम्मद नु सिद्दीकी, शेख सलमान, मोहम्मद शब्बीर खान, हसन सफी मुस्तफा अली, सद्दाम नवस, सय्यद झहिद अल्ली, फारूक अख्तर, सोफिया, मोहम्मद शफीक, जफर इक्बाल, गौश आलम, हरिस रशिद, एहजास असलम, अनम सिद्दीकी, हसन अली, साहिला, मोहम्मद शब्बीर, ईशाद, इबसन शहा, अली अब्बुबकर, रेहान, अमल नौशाद, आदींचा समावेश आहे.शिक्षणामुळे मुस्लिम समाजाचा विकास होऊ शकतो व हा समाज जेवढा मुख्य प्रवाहात येईल, तेवढी या समाजाची प्रगती होईल, हाच संदेश गेल्या पाच वर्षांतील चढ्या आलेखावरून समाजात झिरपू लागल्याचे दिसते. यूपीएससी उत्तीर्ण झालेले हे मुस्लिम अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत सामील होतील, तर मुस्लिम समाजाचे प्रश्न हाताळण्यास व त्यावर उपाययोजना करण्यास हातभार लागणार आहे.मुस्लिम समाजाच्या विकासाच्या योजनांचा निधी त्याच समाजावर खर्च होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास मुस्लिम समाजातील अभ्यासक व जाणकार व्यक्ती व्यक्त करतआहेत.