शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

रोज हवा सोडल्याने दुचाकीधारक त्रस्त

By admin | Updated: April 10, 2016 00:53 IST

नायगाव रेल्वे परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या चाकातील हवा काढण्याचे प्रकार वाढल्याने कामावरून परत आलेल्या शेकडो चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा

विरार : नायगाव रेल्वे परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या चाकातील हवा काढण्याचे प्रकार वाढल्याने कामावरून परत आलेल्या शेकडो चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, याठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुुुरु असल्याने वाहतूक कोंडी होत असल्यानेही लोक त्रस्त झाले आहेत.नायगाव रेल्वे स्टेशनवरून दरवर्षी किमान तीस-चाळीस हजार चाकरमानी लोकलने प्रवास करतात. यातील हजारो आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने स्टेशन परिसरात ठेऊन मुंबईत कामाला जातात. याठिकाणी रेल्वेचे पे अँड पार्क कमी पडू लागले आहे. पण, दुसरी कोणतीच सोय नसल्याने लोक रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून निघून जातात.गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनाच्या चाकातील हवा काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे संध्याकाळी कामावरून आलेले वाहनचालक हैराण होऊ लागले आहेत. कुणीतरी समाजकंटक हा उपद्रव करीत असून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा वसई काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी दिली आहे. तसेच वसईतील अनेक गावांमधील शेकडो नागरीक मुंबईला जातांना गाड्या रस्त्यावर ठेऊन जावे लागते. वाहनांचे संरक्षण करण्यास कुणीही नसल्याने दररोज अनेक वाहनांचे नुकसान केले जाते. म्हणूनच स्टेशन परिसरात पार्किंगची सोय करण्यात यावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी केली आहे. नायगाव स्टेशनकडे जाणार रस्ता अतिशय छोटा आहे. त्यात आता रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. त्यासाठी लागणारे साहित्य रस्त्या कडेला ठेवले जात असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सुुरु झाला आहे. यातून लोकांची सुटका करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.