चिंचणीत हाणामारी, गुन्हे दाखल, बारा मोटरसायकलींची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:03 AM2018-11-10T03:03:51+5:302018-11-10T03:04:49+5:30

एका बाजूला नवीन वर्षाचे स्वागत होत असतांनाच दुसº्या बाजूला चिंचणी येथे एका किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन बारी -मांगेला या दोन समाजातील काही तरुणांमध्ये रात्री बारा ते एकच्या सुमारास झालेल्या हाणामारी व दगड फेकीत पाच ते सहा जण जखमी झाले असून पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन १३ मोटर सायकल फोडण्यात आल्याने नवीन वर्षाला गालबोट लागले आहे.

Troubled people, criminal cases, busted motorcycle collision | चिंचणीत हाणामारी, गुन्हे दाखल, बारा मोटरसायकलींची तोडफोड

चिंचणीत हाणामारी, गुन्हे दाखल, बारा मोटरसायकलींची तोडफोड

googlenewsNext

डहाणू- एका बाजूला नवीन वर्षाचे स्वागत होत असतांनाच दुसº्या बाजूला चिंचणी येथे एका किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन बारी -मांगेला या दोन समाजातील काही तरुणांमध्ये रात्री बारा ते एकच्या सुमारास झालेल्या हाणामारी व दगड फेकीत पाच ते सहा जण जखमी झाले असून पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन १३ मोटर सायकल फोडण्यात आल्याने नवीन वर्षाला गालबोट लागले आहे.
चिंचणीत गुरु वारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मोटर सायकलने कट मारल्याचे क्षुल्लक प्रकार घडले. त्यानंतर चिंचणी पोलीस चौकीत मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यानंतर तो जमाव तिथून गेल्या नंतर रात्री बारा ते एकच्या सुमारास एकाच प्रभागात राहत असलेल्या बारी मांगेला (मच्छीमार) समाजातील काही तरुणांचा जमाव समोरासमोर येऊन त्याच्यात हाणामारी व जोरदार दगड फेक सुरु झाली. यावेळी केवळ तीनच पोलीस उपस्थित असल्याने या धुमश्चक्रीत ते जेमतेम बचावले यात सहाजण जखमी झाले असून त्यांना डहाणू - वापी येथील रु ग्णालयात दाखल केले आहे. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात तीस ते चाळीस जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान चिंचणी येथे झालेल्या हाणामारीत अनेकांचे घरांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या तिथे शांतता असून दंगल नियंत्रण पथक व स्थानिक पोलीसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबतीत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून शांतता समितीचे सदस्य तसेच पालघर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण तिथे तळ ठोकून बसले असून परिस्थिती नियंत्रणा खाली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Troubled people, criminal cases, busted motorcycle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.