पालघर:- शुक्रवारी रात्री साध्या वेषातील पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पालघर आरपीएफ पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.
पालघर पूर्व भागातील वीरेंद्र नगर येथे राहणारे स्वप्नील शैलेश पालांडे (वय २३ वर्ष), कुणाल कुमार दुबळा (23) आणि अफरोज खलील शेख 28 ह्या तिघांना साध्या वेशातील पोलिसांनी पकडून मारहाण केल्यानंतर ही तिन्ही मुलं त्या पोलिसांच्या हातून निसटून पळाले. पोलीस त्यांच्या मागे पळत असताना ही मुलं पालघर जैन मंदिराच्या जवळील रेल्वे ट्रॅक वरून पळून जात असताना एका मालगाडीने त्या तिघांना उडवले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने आमच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Web Summary : Three youths died in Palghar after being hit by a freight train while fleeing plainclothes police. Relatives allege police actions caused the fatal accident.
Web Summary : पालघर में सादे कपड़ों में पुलिस से भागते समय मालगाड़ी की चपेट में आने से तीन युवकों की मौत हो गई। परिजनों ने पुलिस कार्रवाई को घातक दुर्घटना का कारण बताया।