पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:57 IST2026-03-14T15:55:04+5:302026-03-14T15:57:52+5:30
पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्...
पालघर:- शुक्रवारी रात्री साध्या वेषातील पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पालघर आरपीएफ पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.
पालघर पूर्व भागातील वीरेंद्र नगर येथे राहणारे स्वप्नील शैलेश पालांडे (वय २३ वर्ष), कुणाल कुमार दुबळा (23) आणि अफरोज खलील शेख 28 ह्या तिघांना साध्या वेशातील पोलिसांनी पकडून मारहाण केल्यानंतर ही तिन्ही मुलं त्या पोलिसांच्या हातून निसटून पळाले. पोलीस त्यांच्या मागे पळत असताना ही मुलं पालघर जैन मंदिराच्या जवळील रेल्वे ट्रॅक वरून पळून जात असताना एका मालगाडीने त्या तिघांना उडवले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने आमच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.