शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 5:36 AM

Vasai-Virar Municipal Corporation : आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वसई : नालासोपारा येथील खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री देण्यात आले आहे. आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वसई विरार-शहर महानगरपालिका हद्दीतील रिद्धी विनायक हॉस्पिटल व विनायका हॉस्पिटल येथील सोमवारी झालेल्या कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्ट करताना महापालिकेने म्हटले आहे की, १२ एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये ७ व रिद्धीविनायक या खासगी रुग्णालयामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला असल्याची बातमी वस्तुस्थितीला अनुसरून नाही.

दरम्यान, विनायक हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयास लिओ ऑक्सिजन एजन्सी या ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी १३९ जम्बो सिलिंडर व १ Dura सिलिंडर  असे १६६ जम्बो सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. अर्थातच एका जम्बो सिलिंडरमध्ये ७ हजार लिटर ऑक्सिजन असून, त्याप्रमाणे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे.

नालासोपारास्थित रिद्धीविनायक हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी ५० जम्बो सिलिंडर व १२ एप्रिल रोजी ६० असे एकूण ११० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन १२ एप्रिल रोजी १० टन ऑक्सिजन प्राप्त करून घेतला असून, महानगरपालिकेची स्वतःची २ व इतर खासगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे, असेही वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस