पूर्व वैमनस्यातून तरुणाचे हात छाटले; दोन पथकांसह १०० पोलिसांची शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:27 AM2023-12-17T07:27:39+5:302023-12-17T07:27:45+5:30

सुशील रिक्षाने घरी जात असताना धुमाळ याने गाडी रिक्षाला आडवी केली आणि त्याला बाहेर खेचत हल्ला केला.

The young man's hands were cut off from the former enmity; A search operation of 100 policemen with two squads | पूर्व वैमनस्यातून तरुणाचे हात छाटले; दोन पथकांसह १०० पोलिसांची शोधमोहीम

पूर्व वैमनस्यातून तरुणाचे हात छाटले; दोन पथकांसह १०० पोलिसांची शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : देवपे येथे सुशील अजय भोईर (२७) यांचे पूर्व वैमनस्यातून माजी सभापती श्रीकांत धुमाळ यासह इतरांनी दोन्ही हात छाटल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. 

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी जनार्दन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दोन पथके तयार केली. सुशील भोईर आणि माजी सभापती श्रीकांत धुमाळ यासह इतर तरुणांमध्ये पूर्व वैमनस्य होते. सुशील रिक्षाने घरी जात असताना धुमाळ याने गाडी रिक्षाला आडवी केली आणि त्याला बाहेर खेचत हल्ला केला.

पोलिसांकडून शोध
धुमाळ याच्यासह अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतरांवर गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. फरार आरोपींचा सुमारे १०० पोलिस शोध घेत आहेत. 

कंपन्यांची झाडाझडती
फरार आरोपी लपण्यासाठी मुरबाडमधील बंद कंपन्यांचा आधार घेत असावेत, यासाठी सुमारे १९६ कंपन्यांची झाडाझडती घेतली. आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.

 

Web Title: The young man's hands were cut off from the former enmity; A search operation of 100 policemen with two squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.