वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:42 IST2026-02-20T12:40:14+5:302026-02-20T12:42:27+5:30

ही मुलगी आठवीत  शिकत होती. २८ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने तुंगारेश्वर डोंगरावर स्काउट्स अँड गाइड्स शिबिर आयोजित केले होते. तेथून ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह आढळला होता.  

The mystery of the death of 'that' 13-year-old student in Vasai will be solved after 15 years; High Court orders handing over the investigation to CBI | वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश

वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश

नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या एका १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनंतर उलगडण्याची शक्यता  आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीरंग शिरसाट यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची चौकशी नव्याने  सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. योगेश राऊळ यांनी  याचिकेद्वारे चौकशीची मागणी केली होती.

ही मुलगी आठवीत  शिकत होती. २८ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने तुंगारेश्वर डोंगरावर स्काउट्स अँड गाइड्स शिबिर आयोजित केले होते. तेथून ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह आढळला होता.  

काय घडले होते?

या मुलीच्या मृतदेहाचे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन डॉक्टरांच्या पॅनलने शवविच्छेदन केले होते. तिच्या फुप्फुसात पाणी आढळले नव्हते.

पीडितेच्या गुप्तांगांवर व मांड्यांवर दुखापतीच्या खुणा आढळल्या होत्या. त्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे तसेच तिची हत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. माणिकपूर पोलिसांनी या अहवालाच्या आधारे बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र, जे. जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू अपघाती होता. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्धचा खुनाचा गुन्हा मागे घेऊन अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.

Web Title : वसई की लड़की की मौत का रहस्य: उच्च न्यायालय ने 15 साल बाद सीबीआई जांच का आदेश दिया

Web Summary : वसई में 13 वर्षीय लड़की की मौत का 15 साल पुराना रहस्य अब सुलझने वाला है। बॉम्बे हाई कोर्ट ने मामले की सीबीआई जांच का आदेश दिया है, क्योंकि शुरुआती ऑटोप्सी रिपोर्ट में बलात्कार/हत्या और आकस्मिक मौत दोनों के संकेत मिले थे। लड़की 2010 में एक स्कूल स्काउटिंग यात्रा के दौरान गायब हो गई थी; बाद में उसका शव मिला।

Web Title : Vasai Girl's Death Mystery: High Court Orders CBI Probe After 15 Years

Web Summary : The 15-year-old mystery surrounding a 13-year-old girl's death in Vasai is set to unravel. The Bombay High Court has ordered a CBI investigation into the case, following discrepancies in initial autopsy reports suggesting both rape/murder and accidental death. The girl disappeared during a school scouting trip in 2010; her body was later found.