भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 06:50 IST2025-08-22T06:50:21+5:302025-08-22T06:50:53+5:30

पोटदुखी बरी करण्यासाठीच्या औषधाचे उत्पादन सुरू असताना विषारी वायूची गळती

The fear doesn't end here... Air leak in a company in Tarapur; 4 people dead, two in critical condition | भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, बोईसर (पालघर): तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मास्युटिकल्स या कारखान्यात गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास विषारी वायूगळती होऊन एका अधिकाऱ्यासह तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर एक अधिकारी व एक कामगार गंभीर जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मेडली फार्मास्युटिकल्स कारखान्यात अलबेंडोझोल या पोटदुखी बरी करण्यासाठीच्या औषधाचे उत्पादन सुरू असताना विषारी वायूची गळती झाली. असिस्टंट मॅनेजर कल्पेश राऊत व कामगार कमलेश यादव, धीरज प्रजापती आणि बंगाली ठाकूर, या चार जणांचा बळी गेला.

भय इथले संपत नाही...

मागील १५ दिवसांत तारापूर एमआयडीसीमध्ये घडलेल्या सहा दुर्घटनांमध्ये चारजणांचा मृत्यू तर एक जखमी यापूर्वी झाले असल्याने तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन मॅनेजर रोहन शिंदे आणि सुरक्षा विभागातील नीलेश हडल हे दोघे जखमी झाले.

Web Title: The fear doesn't end here... Air leak in a company in Tarapur; 4 people dead, two in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू