शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

ठक्कर बाप्पा भ्रष्टाचार : भोये निलंबित

By admin | Updated: October 4, 2016 02:12 IST

ठक्कर बाप्पा योजनेमध्ये १००कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व आदिवासी विकास चे अप्पर आयुक्त मिलींद गवांदे

राहुल वाडेकर,  विक्रमगडठक्कर बाप्पा योजनेमध्ये १००कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व आदिवासी विकास चे अप्पर आयुक्त मिलींद गवांदे यांनी तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील आदिवासी विकास निरीक्षक सखाराम गोपाळ भोये यांना दि. २९ सप्टेंबर रोजी निलंबीत करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मिलींद गवांदे यांनी केली आहे. या भ्रष्टाचारामध्ये सामील असणाऱ््या सर्व अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून या भ्रष्टाचाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होते आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चार तालुक्यांतील ४२९ गावांमध्ये १५८७ विकास कामे झाल्याचे व त्यावर १५४ कोटी ३३ लाख रु पये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र यातील निम्म्याहून अधिक कामे झालीच नसल्याचा आरोप करून २००७-०८ ते २०१४-१५ या दरम्यांन १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांकडे केला गेला होता. खुडेद - घोडीचा पाडा येथे मंगल कार्यालयाची इमारत न बांधताच १० लाख रु पयांचा निधी हडप केला गेला असल्याचा जो गौप्यस्फोट लोकमतने प्रसिद्ध केला होता. तो ही पुरावा म्हणून दिला गेला होता. चौकशी होऊन भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होताच जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी तातडीने अप्पर आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण माळी यांना आणण्यात आले. त्यांनी या प्रकरणाचा समाधानकारक तपास करून अहवाल अप्पर आयुक्तांना पाठवला. त्या अहवालावरून काम पूर्ण झाल्याचे खोटे पाहाणी अहवाल सादर करणाऱ्या सखाराम भोये यांना निलंबीत करण्यात आले आहे. ते सध्या डहाणू येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये कार्यरत होते.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये अनागोंदी कारभार सुरु असून कुणाचा पायपोस कुणाला नाही. म्हणूनच ठाणे अप्पर आयुक्त कार्यालयाबरोबरच १३ जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.