शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 19:54 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची  प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

हितेंन नाईक -

पालघर- तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी स्टाफ नर्सकडून (पुरुष) चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशानंतर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची  प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

ज्या अर्थी हा कर्मचारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता, त्या अर्थी यापूर्वीही त्याने असे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट होते. तसेच, संबंधित  वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मूक संमती शिवाय हे शक्य नसल्याने त्यांच्यावरील कारवाईचे काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या एका १३वर्षीय मुलीवर उपचार करण्यासाठी त्या केंद्रातील डॉक्टरांना बोलवण्या ऐवजी तेथे नियुक्त. संबंधित स्टाफ नर्स (पुरुष) या पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या मुलीवर उपचार सुरू करीत इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. ह्यावर त्या मुलीच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर, या कर्मचाऱ्याने त्यांनाच उलट सुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. हो मी दारू प्यायलोय, असेही तो म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या समोरच हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. नातेवाईकांनी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून हा प्रकार समोर आल्यानंतर प्रसार माध्यमांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणा हलली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,आरोग्य सभापती संदेश ढोणे ह्यांनी ह्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ह्यांनी कंत्राटी कामगार राकेश आढाव ह्याची सेवासमाप्ती करण्याचे लेखी आदेश  काढले.

परंतु कर्मचारी रुग्णावर उपचार करीत असताना तिथे संबंधित वैद्यकीय अधिकारी ही उपस्थित असल्याने त्यांच्या मुक संमती शिवाय हे शक्य नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. असे उपचार यापूर्वीही अनेक वेळा घडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
भविष्यात अशा प्रकारे मद्यपान करणारे आणि कामचुकार कर्मचारी आढळल्यास तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.

टॅग्स :palgharपालघरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल