वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:21 PM2021-05-24T20:21:23+5:302021-05-24T20:24:33+5:30

Tauktae Cyclone Vasai News : मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Tauktae Cyclone In Vasai the department of revenue and agriculture is working day and night | वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

googlenewsNext

आशिष राणे 

वसई - वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मागील आठवड्यात घोंघावलेलं तौत्के चक्रीवादळ व त्यामुळे झालेली अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसईकरांच्या शेती, बागायती व घराचं अतोनात नुकसान झाले होते. चक्रीवादळ शमताच तिसऱ्या दिवशीपासूनच वसई तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने येथील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरुवात केली. दरम्यान युद्धपातळीवर रात्रंदिवस महसूल व कृषी विभागाने तहसीलदार वसई यांच्या नेतृत्वाखाली आजवर त्यामुळे नुकसानीचे आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर यात कृषी म्हणजे शेतीचे जवळपास 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली आहे

मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या संदर्भातील माहिती वसई तहसीलदार भगत यांनी देताना स्पष्ट केले की,या सर्वच नुकसान ग्रस्त व पीडितांच्या पंचनाम्यांना आम्ही महसूल विभागाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत तर शेतीचे आता पर्यंत 70 टक्के पंचनामे झाले आहेत. एकुणच या संपूर्ण कामासाठी साधारण 32 तलाठी, 6 सर्कल,2 नायब तहसीलदार,31 ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. वादळात झालेल्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे काम लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभाग उत्तम रित्या काम करत आहे. 

6 सर्कलमध्ये उत्तम काम व पंचनामे 

आतापर्यंत 6 सर्कलमध्ये झालेल्या पंचनाम्यामध्ये 17 कच्ची घरे पडली आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना एकूण 16 लाख 16 हजार 700 रुपये अनुदान मिळावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये  मांडवी येथील कच्या 7, माणिकपूर येथील  3,आगाशी येथील 3 आणि निर्मळ येथील 4 घरांचा समावेश आहे. या सगळ्यात वादळ आल्या दिवसापासून महसुलचे कर्मचारी व  ग्रामसेवक सातत्याने काम करत आहेत. वादळाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून ते स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यापर्यंत कर्मचारी हे मागील 8 दिवसांपासून सतत काम करत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले 

महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर पंचनामा करीत आहेत. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला त्याची शासन नियमानुसार भरपाई कशी मिळेल या दृष्टीने युद्धपातळीवर आम्ही काम करत आहोत. दोन ते चार दिवसात सर्व प्रकारचे पंचनामे ही पूर्ण होतील 

- उज्वला भगत, वसई तहसीलदार
 

Web Title: Tauktae Cyclone In Vasai the department of revenue and agriculture is working day and night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.