सुशांतसिंग प्रकरण बिहार निवडणुकीपुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:15 IST2020-11-27T00:15:26+5:302020-11-27T00:15:56+5:30

पालकमंत्री दादा भुसे ; शिवसेनेची प्रत्येक चौकशीची तयारी

Sushant Singh case for Bihar elections | सुशांतसिंग प्रकरण बिहार निवडणुकीपुरते

सुशांतसिंग प्रकरण बिहार निवडणुकीपुरते

नालासोपारा : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे बिहार निवडणुकीपुरतेच चालले होते. त्यावेळी ज्या लोकांनी आरोप केले ते म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होता, असे मत पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी व्यक्त केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत भुसे बोलत होते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही त्यावेळी ज्यांनी आरोप केले, ते तोंडाशी पडले होते, आताही तसाच प्रयत्न केला जात आहे, परंतु शिवसेनेची प्रत्येक चौकशीची तयारी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

वसईतील पालिकेच्या सर डी.एन. पेट्रीट रुग्णालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन समारंभाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, कंगना राणावत यासारख्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षाची बाजू मांडली होती. तसेच एकामागून एक सुरू असलेल्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खदखद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Sushant Singh case for Bihar elections