शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा दुबे खून खटला, नेमके काय घडलेले, ज्याने देश हादरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 05:17 IST

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : ३४ वर्षांपूर्वी ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वेस्थानकावर पेपर वाचत बसलेल्या बिल्डर सुरेश दुबेवर सहा ते सात आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या नागरिकांनी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरचा हा थरार पाहिला होता, ते आजही त्याविषयी दबक्या आवाजात बोलतात. या हत्याकांडामुळे भाई ठाकूर टोळीची दहशत समोर आली आणि देशभरात खळबळ उडाली. भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरूंग लावणारा म्हणून सुरेश दुबे खून खटला ओळखला जातो.

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या. याच काळात नालासोपारामध्ये दुबे कुटुंबीय स्थिरावले होते. दुबे कुटुंबातील मालकीची एक जागा ठाकूर टोळीने मागितली होती. त्याला सुरेश दुबे याने नकार दिला होता. खरे तर प्रकरण येथेच थांबले होते; परंतु एका बिल्डरने नकार दिला तर आपली नाचक्की होईल व दबदबा कमी होईल, अशी भीती भाई ठाकूर यांना वाटली होती.  त्यामुळे भाई ठाकूर यांनी सुरेश दुबेला एकदा आपल्या कार्यालयात बोलावून दमदाटी केली व जागा सोडली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिळत आहे.

या धमकीमुळे दुबे कुटुंबीय घाबरले. त्यांनी सुरेश दुबेला गावी जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे सुरेश दुबे ९ ऑक्टोबरला गावी जाण्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वेस्थानकावर आला. गाडी येण्यास उशीर असल्यामुळे दुबे एक इंग्रजी पेपर वाचत बसला होते. दुसरीकडे आपली दहशत कायम ठेवण्यासाठी सुरेश दुबेला जाहीररीत्या मारण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यामुळे फलाट क्रमांक दोनवर सुरेश दुबेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती.

राज्यभरात उडाली खळबळ  दुबे आणि त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.   १९८९ मध्ये याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती.   मात्र, १९९२ मध्ये याप्रकरणी  गुन्हा दाखल करून घेतला गेला.   वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव या खून प्रकरणी घेण्यात आल्याने, संपूर्ण राज्यात खळबळ माजली.   आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरील कथित आरोपांमुळे हा खटला हाय प्रोफाइल म्हणून देशभरात गाजला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी