या हंगामातील पीककर्जही माफ करा, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:53 AM2020-03-05T00:53:38+5:302020-03-05T00:53:42+5:30

अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

Sorry for the crop loans this season too, farmers demand | या हंगामातील पीककर्जही माफ करा, शेतकऱ्यांची मागणी

या हंगामातील पीककर्जही माफ करा, शेतकऱ्यांची मागणी

googlenewsNext

पारोळ : अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.
भातशेती मजुरी, खते, बियाणे, साधने हे शेती कसण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने शेती करणे शेतकरी वर्गाला परवडत नसतानाही सेवा सोसायटीचे कर्ज काढून शेतकरी शेती करतो. पण यंदा पूर्ण रब्बी हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गाला भातपिकाची दुबार पेरणी व लावणी करावी लागली. तसेच पिकाची कापणी केली असताना सतत पडण्याºया पावसामुळे पीक व भाताचे तणही वाया गेले. पिकांची सरकारी नुकसानभरपाईही तुटपुंजी मिळाली. यामुळे यंदा आम्ही घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला. सरकारने मागील वर्षी पिकांचे नुकसान झाले नसतानाही थकीत कर्ज माफ केले. यंदा मात्र नुकसानीच्या जखमेवर कमी नुकसान भरपाईचे मलम लावला. यामुळे यंदा घेतलेले पीककर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.
तालुक्यात शिरवली, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे, कणेर सेवा, धानिव सेवा व कामण सेवा या सहकारी सोसायटी असून खरीप व हंगामी पिकासाठी शेतकरी वर्गाला बिनव्याजी पुरवठा करतात.
>मी वीस वर्षांपासून घेतलेले पीक कर्ज भरणा करत असून आम्ही कोणत्याही कर्जमाफीचा लाभ घेतला नाही. पण यंदा मात्र पावसाने माझ्या भात शेतीचे मोठे नुकसान केल्याने आणि सरकारने थकीत पीक कर्ज माफ केले असले तरी या वर्षीचे घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे.
- भालचंद्र पाटील, शेतकरी, उसगाव.

Web Title: Sorry for the crop loans this season too, farmers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.