शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील सेटलमेंट आता होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:59 AM

कामाचे कसलेही मोजमाप न करता काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असा शेरा देवून आजवर अनेक कामांची आगाऊ बिले काढली जात होती

जव्हार : कामाचे कसलेही मोजमाप न करता काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असा शेरा देवून आजवर अनेक कामांची आगाऊ बिले काढली जात होती यामुळे या ठेकेदार आणि अधिका-यांमधील सेंटलमेंटमुळे मोठा भ्रष्टाचार होत होता याची अनेक उदाहरण जव्हार मोखाड्यात पहावयासही मिळतील मात्र आता बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याला चाप बसवला असून तसा आदेशही काढण्यात आला आहे.कोट्यवधी रुपयांची कामे चालू करायाची काम २५ टक्के करायचे आणि काम चालू आहे मोजमाप नोंदी नाहीत असे सांगून रक्कम मात्र ५० टक्क्याहून अधिक द्यायची किंवा काम पूर्ण व्हायच्या आतच पूर्ण रक्कम देऊन टाकायची यामध्ये ठेकेदाराकडून आपले उखळ पांढरे करून घ्यायचे असा प्रकार सर्रास बांधकाम विभागात होतांना दिसत होता मात्र यामुळे अनेक कामे रखडतांनाही दिसून येत होतीमात्र आता या अधिकारी ठेकेदारांच्या सेटलमेंट कारभाराला चाप बसणार असून मोजमाप न करताच बिले देणाºया अधिकाºयावर कारवाई होणार आहे.बांधकामाचे फोटो यामध्ये झालेले बांधकाम आणि काय साहित्य आणले त्याचे फोटोही विभागाच्या वेबसाईटवर टाकणे बंधनकारक होणार आहे. यामुळे एकाच कामाचे विविध अँगलमधील फोटो काढून ते वेगवेगळ्या कामाचे भासविणे अशा प्रकारांनाही आळा बसेल.>खाबुगिरीवर येणार आता अंकुशया महत्वपूर्ण निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होणार असला तरी या दोघांतील अर्थपूर्ण संबधामुळे या निर्णयाची पारदर्शक अमलबजावणी होईल का? हे पाहणे गरजेचे ठरणारे असून कनिष्ठ अभियंत्याने रेकॉर्ड करायचे त्या आधारे उपाभियंत्याने बीले तयार करायची आणि कार्यकारी अभियंत्यानी ती मंजूर करायची अशी या कामांची बिले काढण्याची पद्धत असते.यामध्ये अलिखित टक्केवारी ठरलेली असते मात्र प्रत्यक्ष काम कमी आणि बीले मात्र आगाऊ देण्याच्या प्रक्र ीयेत या टक्क्यांची आकडेवारी मोठी असते अशीही चर्चा आहे. यामुळे या खाबुगिरीवर आता चांगलाच अंकुश येणार आहे.