शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी महसुलाची दांडगाई

By admin | Updated: March 24, 2017 00:56 IST

महसूल वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वसई तहसिल कार्यालयातून जप्तीच्या नोटीसा बजावण्याची दांडगाई केली जात असल्याने

वसई : महसूल वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वसई तहसिल कार्यालयातून जप्तीच्या नोटीसा बजावण्याची दांडगाई केली जात असल्याने वसईत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. १० वर्षांची थकबाकी दाखवून अकृषिक वापरासाठी इमारती, कारखाने आणि चाळींना नोटीसा बजावल्या आहेत. एकेकाला लाख रुपयांपुढील रकमेच्या नोटीसा बजावल्याने महसूल खात्याच्या कारवाईला वसईतून जोरदार विरोध सुरु केला आहे.अ, ब आणि क या तीन वर्गात महसूल वसूल केला जातो. अ वर्गात अकृषिक, बिगरशेती, भूसंपादन आदीतून महसूल गोळा केला जातो. ब वर्गात गौण खनिज, रेती लिलावाच्या माध्यमातून महसूल मिळतो. तर क वर्गात विविध करमणूक कराद्वारे महसूल गोळा केला जातो. सध्या रेती बंद असल्याने गौण खनिजातून मिळणारा महसूल खूपच घटला आहे. तर करमणूक कराची शंभर टक्के वसूली झाली आहे. गौण खनिज, स्वामित्व धनातील तूट भरून काढण्यासाठी अकृषिक दंडातून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करण्याचे बडे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. कारखानदारांना जागेचा वाढीव वापर केला जात असल्याचे कारण सांगून व गेल्या दहा वर्षांची थकबाकी दाखवून प्रचंड दंडासाठी लाखो रुपयांच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कारखानदारांनी हा दंड भरण्यास विरोध सुुरु केला आहे. तसेच बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.दुसरीकडे, हजारो इमारती, चाळी आणि जुन्या घरांना अकृषिक वापराच्या नोटीसा बजावल्या आहेत. बिल्डर बांधकाम करून निघून गेले आहेत. आता त्याठिकाणी रहावयास आलेल्या लोकांना लाखो रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. वसुलीसाठी महसूल अधिकारी नोटीसांसोबतच जप्तीच्या नोटीसाही देत दांडगाई करू लागले आहेत. याला बहुजन विकास आघाडीने तीव्र विरोध केला आहे. अ़नेक नगरसेवकांनी दंड भरू नका असे नागरीकांना आवाहन केले आहे. महसूल विभागाच्या अतिरेकी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक सुनिल आचोळकर यांनी दिला आहे. दंडाच्या नोटीसा बजावल्यानंतर काही दलाल मध्यस्थी करून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करू लागले आहेत. यात काही तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसिलदार कचेरीतील काही कर्मचारी सामील असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी केला आहे. (प्रतिनिधी)