शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

रॅम्प ब्रीजसाठी २७ दुकानांवर येणार गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:45 AM

विरार पूर्व शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सद्या डोकेदुखी बनत चालला आहे.

वसई : विरार शहराला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या सद्याच्या उड्डाणपूलाला जोडून विरार पूर्व भागात रॅम्प ब्रीज (जोड उतार पूल) बांधण्याचे काम २०१५ साली मंजूर झाले होते. हा पूल पालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. मात्र या मार्गातील २७ दुकानांचे अडथळे दुर करण्याचा निर्णयÞ पालिकेने महासभेत जाहीर केल्याने या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. विश्वासात न घेता, कुठलेही लेखी आश्वासन न देता पालिकेने हा निर्णयÞ परस्पर कसा घेतला असा सवाल या दुकानदारांनी केला आहे. जोडउतार पूलाला विरोध नाही , मात्र दुकानांचे स्थलांतर संमतीशिवाय केल्यास आमचा विरोध असेल असा पवित्रा दुकानदारांनी घेतला आहे.

विरार पूर्व शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सद्या डोकेदुखी बनत चालला आहे. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचावा, वाहतूक कोंडी टाळावी यासाठी पालिकेने शहरातील उड्डाणपूलाला जोडून नवा जोड उतार पुल बांधण्याचे निश्चित केले आहे. सद्या असलेल्या उड्डाणाला जोडणारा हा पूल थेट पालिका मुख्यालयासमोर उतरणार आहे. हा पूल २२० मीटर लांबीचा असून तो ७ मीटर रु ंद असणार आहे. त्याचा खर्च ८ कोटी रु पये आहे. विरार शहरातील पूर्व आण िपश्चिमेला जोडणार्Þया उड्डाणपूलाला जोड पूल बनविण्याच्या कामाला२०१५ मध्ये मंजुरी मिळाली होती. सध्याच्या उड्डाणपूलावरून विरार पुर्वेला हा जोड पूल पालिका मुख्यालयाच्या दिशेने उतरविला जाणार आहे. यामुळे विरार शहरातील नागरिकांना आता पर्ु्व पश्चिमेला जे-या करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. ज्या ठिकाणी हा जोडपूल बनविला जाणार आहे, त्या ठिकाणी असलेल्या बाजारातील मंदिरासमोरील २७ दुकाने बाधित होणार आहे. पालिकेने नुकत्याच झालेल्या महासभेत ही २७ दुकानांच्या स्थलांतरांचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले होते.त्यांना हलविणारनियोजित रॅम्प ब्रीज (जोड उतार पूलासाठी रेल्वेमार्गालगतची पालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने असलेली २७ दुकाने हलविण्यात येणार आहेत. यात तयार कपड्याची दुकाने, ज्वेलर्स, पादत्राणे, होलसेल व्यापारी, भांडी विक्र ेते, हार्डवेअर सामान विक्र ेते, कपडे ड्राय क्लिनर, टिव्ही रिपेअरींग, रसवंतीगृह अशी दुकाने आहेत.तेथील दुकानदारांशी चर्चा करूनच हा निर्णयÞ घेतला आहे. या दुकानदारांना पालिकेच्या बाजारपेठेत तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी ८ गाळे बनवून देण्यात आले आहेत. पूल तयार झाल्यानंतर पालिकेतर्फे त्यांना रेखांकने करून देण्यात येईल आणि ते स्वखर्चाने पुलाखाली आपली दुकाने बनवतील.- सुदेश चौधरी, सभापती,स्थायी समतिी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार