विरार - मनवेलपाड्यात दूषित पाणी, ऐन पावसाळ्यात रोगराईची नागरिकांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 23:54 IST2019-08-13T23:54:06+5:302019-08-13T23:54:24+5:30
विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.

विरार - मनवेलपाड्यात दूषित पाणी, ऐन पावसाळ्यात रोगराईची नागरिकांना भीती
विरार : विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील न्यू जीवदानी दर्शन चाळ, गणेशनगर आणि परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी तक्रार करूनही अद्याप महापालिकेने दखल घेतलेली नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागत आहे. यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरातील एका चाळीतून निघणारी जलवाहिनी उघड्यावरच सोडण्यात आली असल्याचीही या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. शिवाय संपूर्ण परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एका मटन विक्र ेत्याच्या दुकानातून धुतले गेलेले बकऱ्यांचे रक्त जलवाहिनीत मिसळून संपूर्ण परिसराला रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. त्यावेळीही महापालिकेने केवळ या मटन विक्र ेत्याला पाच हजार दंड करून मोकळे सोडले होते.
मात्र, अद्यापही दूषित पाणी पुरवठा होत असून रहिवाशांना गंभीर आजार होण्याची भीती भेडसावते आहे. तर रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला असताना पालिका प्रशासनातर्फे हलगर्जीपणा होत असल्याने रहिवासी हैराण आहेत.
दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्यात माती मिसळल्याने पाणी गढूळ झाले होते. पण लगेचच त्यावर उपाय योजना करून तीन तासात स्वच्छ पाणी पुरवठा दिला होता.
- महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग (नाव देण्यास मनाई)