शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 11:56 PM

प्रलंबित प्रश्नांचा तहसीलदार कचेरीत बसून आढावा !

वसई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरच्या गड शिवसेना-भाजप या महायुतीने जिंकल्याने बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीय कार्यकर्ते आता सक्रि य झाले असून यांच्यासह पाच वर्षांनी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित पुन्हा सक्रि य झाले आहेत. दरम्यान केंद्रात मोदी व महाराष्ट्र राज्यातही युतीचे राज्य येणार असल्याची चिन्हे असल्याने पुन्हा पंडित यांनी राजकारणात उडी घेतलीे.लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाने आम. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीला पराभूत करून धोबी पछाड दिल्याने वसई विधानसभा मतदारसंघातील गणिते बऱ्यापैकी बदलण्याची चिन्हे आहेत. परिणाम म्हणून पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा व त्यातील युतीच्या विजयाची निकालाची आकडेवारी पाहिली तर बविआच्या नालासोपारा व वसई विधानसभा मतदारसंघात युतीने बरीच मजल मारली आहे.त्यामुळेच यदाकदाचित माजी आम.विवेक पंडित यांनी पुढची गणिते जुळवून जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.अलीकडेच पंडित यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्वी राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्षपद बहाल केले होते आणि आता तर राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन भाजपाने साखरपेरणीच केली आहे.वसई शासकीय विश्रामगृह येथे श्रीगणेशा करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून पुन्हा या आठड्यात दुसºयादा वसई तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून जनता दरबार, सभा बैठका घेत आहेत.त्यामुळेच या सर्व क्लृप्त्या म्हणजेच वसईच्या राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय होण्याची लक्षणं आहेत. विवेक पंडित यांच्या सक्रि यतेमुळे बविआच्या पोटात गोळा !२०१४ ची विधानसभा निवडणूक थोड्य फार फरकाने पराभूत झाल्यावर पंडित अज्ञातवासात गेले हे सर्वश्रृत आहे. त्यातच आपण राजकीय संन्यास घेतल्याचे त्यावेळी स्वत: पंडित यांनीच जाहीर केल्याने वसई विधानसभा क्षेत्रातील बविआ विरोधी गट थंड झाला होता. मात्र गतवर्षी पोट निवडणूक व आता लोकसभा निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागे राहून मोठी कामिगरी बजावली. आणि त्याचे फळ त्यांना राज्य सरकारने महामंडळ तथा राज्यमंत्री पद देऊन परतफेड केली.2014 विधानसभा निवडणुकीची आकडेवारी !2014 ची पंडित विरुद्ध ठाकूर या दोघांच्या विधानसभा मतांची आकडेवारी पाहता पंडित यांना मतदारांनी नाकारले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना ९७,२९१ तर पंडित यांना ६५,३९५ मते मिळाली होती. सन २००९ मध्ये पंडित यांना ८१,३५८ तर बविआला ६४,५६० मताधिक्य मिळाले होते. २०१९ ची बाजी विवेक पंडित मारणार? गावे वगळली जाणार पश्चिम पट्टीतील ती २९ गावे आणि महानगरपालिका हा फॅक्टर जोरदार चालल्याने पंडित त्यावेळी बाजी मारून गेले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गावे वगळण्याची प्रक्रि या जवळ येऊन ठेपली आहे. पुढे तीच प्रक्रि या किचकट होत जाईल. त्रिसूत्री कारणांचा फायदा पंडितांना; आणि पंडित निवडून येणार ! तरीही पंडित यांना लोकसभा निवडणूक व त्याच्या आताच्या मतांचा फायदा, बविआ विरोधी मते, आणि राज्य सरकार २९ गावे वगळून त्या गावात नगरपरिषद अथवा स्वतंत्र नगरपालिका तयार करणार म्हणजेच जवळपास २२ हजार मते कमी होणार म्हणजेच या सर्व गोष्टीचा फायदा पंडित यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा