धक्कादायक! पैश्याच्या वादातून हाताच्या नसा कापून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:38 IST2024-01-24T16:36:49+5:302024-01-24T16:38:44+5:30

अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील घटना, आरोपी अटक.

One person was killed due to a money dispute in nallasopara mumbai | धक्कादायक! पैश्याच्या वादातून हाताच्या नसा कापून एकाची हत्या

धक्कादायक! पैश्याच्या वादातून हाताच्या नसा कापून एकाची हत्या

नालासोपारा : अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्याच्या वादातून एकाच्या दोन्ही हाताच्या मनगटाच्या नसा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्नाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात करत हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी मंगळवारी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

२१ जानेवारीला आरोपी अल्फरान चाँद उस्मान खान (२२) याने मयत नागेश चंद्रय्या सेनीगरपु (४८) वर्षे यांची विरारच्या प्रिमियम पार्क येथील पृथ्वी बिल्डींगमधील राहत्या घरी हत्या केली. आरोपी घटनेच्या दिवशी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घरी आल्यावर मयत नागेश याने आरोपीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात नागेश यांच्या दोन्ही हाताच्या मनगटाच्या नसा कापल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

१) घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला. अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासात हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यावर आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 

२)आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. - रणजितसिंग परदेशी (सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी, अर्नाळा पोलीस ठाणे)

Web Title: One person was killed due to a money dispute in nallasopara mumbai